-लांजा नगरपंचायतीतून कुवे गावाला वगळा

-लांजा नगरपंचायतीतून कुवे गावाला वगळा

Published on

-rat२२p१४.jpg -
P२५N८६३१४
लांजा ः मंत्री नीतेश राणे यांना निवेदन देताना अशोक गुरव, दीनानाथ सुर्वे, कृष्णा निवळे, केशव गुरव आदी.
----
लांजा नगरपंचायतीतून कुवे गावाला वगळा
मंत्री नीतेश राणेंना निवेदन ; सर्वसामान्य नागरिकांची कुचंबणा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २२ ः घनकचरा प्रकल्प व विकास आराखड्यावरून लांजा नगरपंचायत विरुद्ध ग्रामस्थ असे वाद सुरू आहेत. आता कुवे गावच्या रूपाने नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातून कुवे गावाला वगळण्यात यावे, अशी मागणी कुवे ग्रामपंचायत संघर्ष समितीने मत्स्य व्यवसाय व बंदरेविकास मंत्री नीतेश राणे यांच्याकडे केली आहे.
नगरपंचायत कार्यक्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या कुवे गावातील नागरिकांनी यापूर्वी कृती आराखडा व कचरा प्रकल्पावरून प्रशासनाला धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले होते. आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. नगरपंचायतीकडे बोट दाखवत कुवे गावासाठी नगरपंचायतच नको, असे कुवे ग्रामस्थांनी म्हटले आहे. मंत्री नीतेश राणे यांना त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे.
६ ऑक्टोबर २०१२ ला लांजा नगरपंचायतीची रचना झाली. लांजा शहर अर्थात लांजा तालुका ठिकाणाबरोबर कुवे व गवाणे या दोन ग्रामपंचायतींचा समावेश नगरपंचायतीत झाला. त्यानंतरच्या काळात गवाणे ग्रामपंचायत क्षेत्राला नगरपंचायतीमधून वगळण्यात आले; मात्र कुवे ग्रामपंचायत क्षेत्र वगळण्याचा विचार झाला नाही. कुवे गाव नगरपंचायतीपासून ५ किमी आहे. गावातील ग्रामस्थ सर्वसामान्य शेतकरी असून, त्यांचा मुख्य व्यवसाय शेती व मोलमजुरी आहे. येथील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. नगरपंचायतीमध्ये कुवे गाव समाविष्ट झाल्यापासून गावाचा विकास योग्यरीत्या झाला नाही. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केल्यास नगरपंचायतीतून बसणारा विविध प्रकारचा कर शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
कुवे ग्रामपंचायतीमध्ये ५० एकर वनक्षेत्र असून, ७० एकर जागा लघुपाटबंधारेच्या तलावामध्ये गेली आहे. त्यामुळे गावाचे क्षेत्र आधीच कमी झाले आहे. कुवे गावाची २०११च्या जनगणनेनुसार २ हजार ६३ लोकसंख्या आहे; मात्र २०११च्या जनगणनेनुसार आता लांजा शहराची लोकसंख्या वाढली असून, सध्या लांजा शहर लोकसंख्येने परिपूर्ण शहर झाले आहे. नगरपंचायत निर्माण करताना शहराला लोकसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी तत्कालीन कुवे गावाचा आधार घ्यावा लागला होता. त्यामुळे आता कुवे गावाला नगरपंचायत हद्दीतून वगळण्यात यावे, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. मंत्री नीतेश राणे यांना निवेदन देताना अशोक गुरव, दीनानाथ सुर्वे, कृष्णा निवळे, केशव गुरव, कमलाकर गोरे, चंद्रकांत नेमण, मदन रडये, सिद्धेश नेमण, चंद्रकांत वाडकर, मोहन नेमण, गणपत सावंत, सचिन खानविलकर, महेश सुर्वे, संतोष दुडये, सचिन वारेशी उपस्थित होते.

चौकट
शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केल्यास नगरपंचायतीतून बसणारा विविध प्रकारचा कर शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
- अशोक गुरव, ग्रामस्थ, कुवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com