मुसळधार पावसामुळे १०० हेक्टर शेतीचे नुकसान
- rat२२p३०.jpg-
२५N८६३४४
रत्नागिरी ः काजळी नदीकिनारी भागात शिरलेले पुराचे पाणी.
---
पुराचा १०० हेक्टर शेतीला फटका
जिल्ह्यातील २८८ शेतकरी बाधित; खेड तालुक्याला सर्वाधिक नुकसान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः जिल्ह्यात मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आल्यामुळे किनारी भागातील ३६ गावातील सुमारे १०० हेक्टर शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. सुमारे २८८ शेतकऱ्यांचे ९ लाखांचे नुकसान कृषी विभागाने नोंदले आहे. सर्वाधिक फटका खेड तालुक्याला बसलेला आहे.
जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी ३००४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आठवडाभरापूर्वी गतवर्षीच्या तुलनेत एक हजार मिमीची तफावत होती; मात्र आठ दिवसात पडलेल्या पावसामुळे ही तफावत कमी झाली आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ३२६९ मिमीची नोंद झाली होती. त्यात १६ ते १९ या कालावधीत जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या प्रमुख नद्यांना पूर आला होता. त्यात जगबुडी, नारंगी, वाशिष्ठी, शास्त्री, गडनदी, बावनदी, काजळी, कोदवली, अर्जुना नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरले होते. त्याचा फटका किनारी भागातील भातशेतीला बसला आहे. पावसामुळे सुमारे १००.६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील ९८ हेक्टर भातक्षेत्राचा समावेश आहे. उर्वरित क्षेत्रात ०.४० हेक्टर फळबागायतीचा समावेश आहे. २८८ शेतकऱ्यांचे ९ लाख रुपयांचे नुकनास या पावसामुळे झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसानंतर खरीप हंगामात प्रथमच सलग पाऊस पडला होता. त्याचे परिणाम शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहेत. वाशिष्ठी, गडनदीचे पाणी अजूनही काही शेतीमध्ये तसेच असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुराच्या पाण्याबरोबर गाळ शेतामध्ये गेल्यामुळे तिथे पुनर्लागवड होणेही अशक्य आहे.
दरम्यान, भातलावण्या पूर्ण झाल्यानंतर पाऊस पडण्याचे प्रमाण अनियमित आहे. त्यातही मोजक्याच महसुली मंडळात पाऊस चांगला पडत आहे. यावर्षी ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. त्यातील ३० टक्के भातलावण्या ८ ते १० दिवस विलंबाने झाल्या. कमी पावसामुळे फुटवे म्हणावे तसे आलेले नाहीत. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
चौकट
बाधित झालेली भातशेतीची आकडेवारी
तालुका* क्षेत्र (हेक्टर)* शेतकरी* नुकसान (रुपये)
मंडणगड* १६.३५* ५९* १ लाख ३८ हजार
दापोली* ३.६१* २९* ३८ हजार
खेड* ८०.३०* १८५* ६ लाख ८२ हजार
चिपळूण* ०.११* २* ३ हजार
संगमेश्वर* ०.११* १०* १० हजार
रत्नागिरी* ०.१४* १४* १० हजार
लांजा* ०.१* १* २ हजार
राजापूर* ०.११* ३* ४ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.