कुडाळात शिंदे शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
swt226.jpg
86358
कुडाळ ः येथे शिंदे शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळात शिंदे शिवसेनेच्या
नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ ः शिंदे शिवसेना पक्षाच्या नूतन शहर पदाधिकाऱ्यांची निवड आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यामध्ये चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर यांची शहर उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच युवासेना व महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांचीही निवड झाली.
येथील एमआयडीसीत आयोजित बैठकीला उपनेते संजय आंग्रे, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, अरविंद करलकर, शहरप्रमुख अभी गावडे, महिला शहरप्रमुख श्रुती वर्दम, रेवती राणे आदी उपस्थित होते. बैठकीत उपस्थितांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. यात-शहर संघटक : सुरेश राऊळ, शहर समन्वयक : राकेश नेमळेकर, शहर उपप्रमुख : प्रथमेश केळबाईकर, चेतन पडते, नीलेश शिरसाट, प्रथमेश कांबळी, युवासेना शहर संघटक : चंदन कांबळी, युवासेना शाखाप्रमुख : कविकाटे–राजाराम गडेकर, भैरववाडी–विनायक धुरी, लक्ष्मीवाडी–साईनाथ नेमळेकर, बाजारपेठ–यश वाळके, ओंकार साळवी, कुडाळेश्वरवाडी–कपिल परब, गांधी चौक–सुरेश सावंत, डॉ. आंबेडकर नगर–नीतेश कुडाळकर, मज्जित मोहल्ला–संदेश सावंत, नाबरवाडी–प्रणित राऊळ, केळबाईवाडी–तेजस पाटकर, गणेश नगर– वरुण पुजारी, शैलेश सावंत, श्रीरामवाडी–समीर अणावकर, मधली कुंभारवाडी–अक्षय कुंभार, एमआयडीसी कुंभारवाडी–गणपत कुंभार, सांगिर्डेवाडी–देवराज राणे. महिला सेनेमध्ये –शहर संघटक : नयना मांजरेकर. सचिव : सलोनी पाटकर. कार्यकारिणी सदस्य : रिया गडेकर, कविता राणे, संजना गडेकर. महिला शाखाप्रमुख : कविलकाटे–रंजना दळवी, सांगिर्डेवाडी–मिलन चव्हाण, कुडाळेश्वरवाडी–उमा कुडाळकर, वेंगुर्लेकरवाडी–मधुरी वेंगुर्लेकर, पडतेवाडी–वैशाली कळसुलकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.