स्मार्ट मीटरबाबत लोकभावना लक्षात घ्या
rat२२p३४.jpg ः
२५N८६३९६
लांजा - महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना लांजा तालुका शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी.
---
स्मार्ट मीटरबाबत लोकभावना लक्षात घ्या
ठाकरे गटाची मागणी ; लांजा कार्यकारिणीतर्फे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २२ ः गणेशोत्सवाच्या कालावधीत तालुक्यात महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत चालू राहावा तसेच स्मार्ट मीटरबाबत लोकभावना समजावून घेऊन त्यावर मार्ग काढावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्यावतीने महावितरणला निवेदन देण्यात आले.
प्रतिवर्षीप्रमाणे काही दिवसांत येणाऱ्या गणेशोत्सवासाठी वारंवार खंडित होणारी वीजसेवा सुरळीत व्हावी तसेच स्मार्ट मीटरबाबत लोकभावना लक्षात घेऊन कारवाई करावी, याबाबतचे निवेदन देताना तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, शिवसहकार सेनेचे जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, महिला तालुका संघटिका पूर्वा मुळे, शहरप्रमुख मोहन तोडकरी, महिला शहर संघटिका सिया लोध, उपतालुकाप्रमुख युवराज हांदे, उपशहरप्रमुख सागर वायंगणकर, विभागप्रमुख अशोक गुरव, विश्वास मांडवकर, उपविभागप्रमुख जितेंद्र कदम, राजेंद्र सुर्वे, शांताराम गुरव, महिला उपविभाग संघटिका दक्षिता राजापकर, उपविभाग संघटक धर्मेंद्र पालये आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.