-सामाजिक भान जपणारे सावर्डेतील गणेशोत्सव मंडळ

-सामाजिक भान जपणारे सावर्डेतील गणेशोत्सव मंडळ

Published on

-rat२३p२९.jpg-
P२५N८६५८२
सावर्डे ः सावर्डे गणेशोत्सव मंडळाची प्राथमिक अवस्थेतील गणेशमूर्ती.
------
काही सुखद---लोगो

सामाजिक भान जपणारे सावर्डेतील गणेशोत्सव मंडळ
उत्सवाचे ५१ वर्षे : मनोरंजन, शैक्षणिकसह विविध विधायक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २३ ः कोकणात सर्वत्र लाडक्या श्रीगणेशाच्या उत्सवाची तयारी सुरू असताना सावर्डे येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ५१ वर्षे पूर्ण केली. मागील पाच दशकांहून अधिक काळ या मंडळाने धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सामाजिक, शैक्षणिक व विधायक उपक्रम राबवून समाजमनात आपला ठसा उमटवला आहे.
सामाजिक सलोखा आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवता यावेत, या हेतूने १९७५ ला (कै.) नाना मोहिरे, (कै.) दत्तात्रय निकम, (कै.) कादीर पारेख आदींच्या पुढाकाराने या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना (कै.) नानासाहेब मोहिरे यांच्या घरी झाली. या मंडळाची व्याप्ती वाढल्यानंतर गावातील प्रमुख मंडळींनी पुढाकार घेऊन पुढील गणेशोत्सव सावर्डे येथील सहाण परिसरातच घ्यावा असे ठरवले.
(कै.) बबनशेठ पवार यांनी सर्वांच्या इच्छेला मान देऊन १९८२ मध्ये सहाणेजवळ पवार सॉमिलच्या जागेत श्री गणेशाची मूर्ती विराजमान करण्यास होकार दिला. आजतागायत या जागेत हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मंडळाने गेल्या ५१ वर्षांमध्ये केवळ मंडप सजावटीवर लक्ष केंद्रित न करता लोकहिताचे अनेक उपक्रम राबवले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मंडळातील श्री गणेशमूर्ती ही गेली ५१ वर्षे शाडूच्या मातीपासूनच बनवलेली असते. ही मूर्ती (कै.) यशवंत सावरटकर व आता त्यांचा मुलगा संतोष सावरटकर साकारतात. मंडळाने रेकॉर्डडान्स स्पर्धा, चलचित्र देखावा, साईदरबार, भजनाच्या डबलबारी स्पर्धा या मनोरंजन कार्यक्रमाबरोबर चिपळूण पूरग्रस्तांना मदत, रेल्वेप्रवाशांना अन्नदान, राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे हे समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. मंडळाचे अध्यक्ष म्हणून तुकाराम साळवी काम पाहत आहेत.

चौकट
आगमन विसर्जनाला दिंडी सोहळा
गणेशमूर्तीचे आगमन व विसर्जन या भारूड मंडळाच्या दिंडी सोहळ्याने होते. संपूर्ण उत्सवामध्ये कुठेही डीजे वा गुलालाचा वापर केला जात नाही. दररोज रात्री गावातील भजनी मंडळ उत्सवामध्ये येऊन आपले भजन सादर करतात. सावर्डेवासियांमध्ये या मंडळाबद्दल आदराची भावना असून, ''सर्वधर्म समभाव जपणारा उत्सव'' अशी ओळख निर्माण झाली आहे. वृद्धांना आरोग्यसुविधा, तरुणांना मार्गदर्शन आणि मुलांना संस्कार असा सर्वांगीण विकास घडवणारे हे मंडळ केंद्रबिंदू ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com