''सामाजिक बांधिलकी''चा ''कुटुंब कल्याण''तर्फे गौरव

''सामाजिक बांधिलकी''चा ''कुटुंब कल्याण''तर्फे गौरव

Published on

‘सामाजिक बांधिलकी’चा
‘कुटुंब कल्याण’तर्फे गौरव
​सावंतवाडी ः आरोग्य क्षेत्रात २४ तास रुग्णांना सेवा देणाऱ्या आणि क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना सहा महिने पोषण आहार देणाऱ्या येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संस्थेचा केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गौरव केला. या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान टी. बी. मुक्त भारत अभियानांतर्गत संस्थेला प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. या अभियानांतर्गत ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणी करून, क्षयरोग रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक मदत पुरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. ‘सामाजिक बांधिलकी’ने तालुक्यातील अनेक क्षयरुग्णांना दत्तक घेतले असून, त्यांच्या उपचाराच्या काळात त्यांना पोषण आहार देत आहेत. संस्थेच्या या कार्याची दखल घेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यांना विशेष प्रमाणपत्र प्रदान केले. ​या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी आनंद व्यक्त केला असून, मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
................
संजय शिंदेंचा आज
मालवण येथे सत्कार
मालवण : उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कोकण विभाग स्तरावर डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित झालेले संजय शिंदे यांचा श्री शिवराज मंच, मातृत्व आधार फाउंडेशन व सहयोगी संस्था यांच्या वतीने उद्या (ता. २४) सायंकाळी ५ वाजता स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे नागरी सत्कार आयोजित केला आहे.
.......................
कणकवलीत पेन्शन
अदालतीचे आयोजन
कणकवली ः येथील पंचायत समितीतर्फे तालुकास्तरीय पेन्शन अदालत ८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित केली आहे. कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनविषयक प्रकरणे व त्याअनुषंगाने लाभांचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन अरुण चव्हाण यांनी केले आहे.
....................
सावंतवाडीतून उद्यापर्यंत
लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद
सावंतवाडी ः गौरी गणपती सणासाठी ठाणे-मुंबई येथून येणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाला सावंतवाडी आगारातून काही एसटी गाड्या पाठविण्यात आल्याने सावंतवाडी आगारातून २५ ऑगस्टपर्यंत लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागांतील काही ठराविक २६ फेऱ्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडी आगारातून देण्यात आली. या कालावधीत सावंतवाडी आगारातून लांब पल्ल्याच्या सोडण्यात येणारी सकाळची नऊची तुळजापूर, ८ वाजता सुटणारी कोल्हापूर व साडेदहा वाजता सुटणारी कोल्हापूर, साडेबाराची देवरुख, दीडची रत्नागिरी, अडीचची रत्नागिरी, दुपारी १२.३० वाजता सुटणारी इचलकरंजी, ११ वाजता सुटणारी गडहिंग्लज, ११ वाजता व सव्वाएक वाजता सुटणारी पणजी, सायंकाळी ६ वाजता सुटणारी गेळे, दुपारी १२.४५ ची शिरोडा, दुपारी ३.४५ ची कुणकेश्वर, सकाळी ११ वाजता सुटणारी फुटब्रीज, दुपारी १ ची बेळगाव, सकाळी ७, ६.३०, १०.३० व दुपारी तीन वाजता सुटणारी कणकवली, सकाळी १० वाजता सुटणारी किरणपाणी, ११.३० ची वेर्ले, दुपारी १२ ची विर्डी-हिवाळे, बाबरवाडी, शिर्डी-फणसवाडी शिरंगे, सव्वासहा वाजता सुटणारी दोडामार्ग-आयी-तिलारी, १२ वाजता सुटणारी असनिये, सव्वासातची दोडामार्ग-भेडशी परमे घोडगे, सकाळी ९.५० ची सातोसे अशा फेऱ्या रद्द केल्याची माहिती नीलेश गावित व स्थानकप्रमुख राजाराम राऊळ यांनी दिली.
...................
तळवडे इंग्लिश स्कूलचे
कॅरम स्पर्धेमध्ये यश
सावंतवाडी ः गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडी येथे आयोजित शालेय कॅरम स्पर्धेत यश संपादन केले. ही स्पर्धा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहयोगाने भरत अॅकॅडमी सावंतवाडीतर्फे आयोजित केली होती. स्पर्धा आमदार दीपक केसरकर यांनी पुरस्कृत केली होती. स्पर्धेत इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या आर्यन दळवीने द्वितीय, तर पियूष परब याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कॅरम प्रशिक्षक म्हणून अश्फाक शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल प्रशालेच्या कार्यकारी अधिकारी मैथिली नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
.....................
तळवडे विद्यालयाचे
ज्यूदो स्पर्धेमध्ये यश
सावंतवाडी ः जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत तळवडे स्कूलच्या स्वरा दळवी आणि मानवी म्हारव या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना ज्यूदो प्रशिक्षक मंगेश घोगळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
....................
मोंड येथे तीन सप्टेंबरला
विद्यार्थी गौरव सोहळा
देवगड ः भाजप पडेल मंडल आणि सिंधुसेवा प्रबोधिनी यांच्यावतीने तीन सप्टेंबरला सकाळी १० वाजता मोंड येथील शां. वि. कुळकर्णी माध्यमिक विद्यामंदिरमध्ये विद्यार्थी गुणगौरव आणि शैक्षणिक करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रमेश सरवणकर यांनी दिली. यावेळी दहावी आणि बारावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. याचवेळी दहावी, बारावीनंतर पुढे काय? याअनुषंगाने शैक्षणिक करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये सत्यवान रेडकर (मुंबई) हे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराला येणाऱ्या नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप होणार आहे. संस्थेच्या माध्यमातून मोंड हायस्कूला शैक्षणिक फळे भेट देण्याचा मानस आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. सरवणकर यांनी केले आहे.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com