चिपळुणात रानभाजी महोत्सव

चिपळुणात रानभाजी महोत्सव
Published on

चिपळुणात रानभाजी
महोत्सव उत्साहात
चिपळूण : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि अर्थ फाउंडेशन चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. उद्‍घाटन आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांच्या हस्ते झाले. उद्‍घाटनानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी महत्त्व यावर मार्गदर्शन केले. या वेळी रानभाज्यांचे प्रदर्शन, पाककृतींचे मार्गदर्शन, विक्री व पदार्थांची चव चाखणे असे उपक्रम राबवण्यात आले. विविध गावांतील महिला शेतकरी बचतगटांनी विक्रीसाठी स्टॉल लावले.

गणेशोत्सव मंडळातर्फे
एकपात्री स्पर्धा
चिपळूण : चिपळूणमधील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी ७४वा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असून, त्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन ३ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता माधव सभागृहात करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी तीन गट ठेवण्यात आले असून गट क्र. १ इ.१ ते ५, गट क्र. २ इ. ६ ते १० व गट क्र. ३ महाविद्यालयीन/खुला गट असे गट आहेत. शालेय गटातील स्पर्धकांना ३ ते ५ मिनिटे तर महाविद्यालयीन/खुल्या गटातील स्पर्धकांना ५ ते ७ मिनिटे सादरीकरणासाठी वेळ दिला जाणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी केले आहे.

रिपब्लिकन सेनेचा
३१ ला मेळावा
चिपळूण : रिपब्लिकन सेनेचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संदेश मोहिते यांनी केले आहे.

खेर्डीतील शिवसेनेची
बैठक उत्साहात
चिपळूण ः खेर्डी ग्रामपंचायत हद्दीत ठाकरे शिवसेनेची बैठक झाली. ठाकरे कुटुंबासोबत एकनिष्ठ आहे, आम्ही कुठेही जाणार नाही, असा निर्धार बैठकीत कार्यकर्त्यांनी केला. बैठकीला शिवसेना युवा कमिटीचे सदस्य विक्रांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन जाधव यांनी केले. या वेळी तालुकाप्रमुख बळीराम गुजर, युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, विभागप्रमुख सचिन शेटये आदी उपस्थित होते. बैठकीदरम्यान सुबाहू भोसले यांची उपविभाग अधिकारी युवासेना, वॉर्ड क्र. ४च्या उपशाखाप्रमुखपदी हरीश नायर यांची नियुक्ती करण्यात आली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com