रत्नागिरी-रत्नागिरी स्थानकात रेल्वेचे स्वतंत्र पोलिस ठाणे
-rat23p28.jpg
86581
रत्नागिरी ः लोहमार्ग पोलिसांचे रत्नागिरी स्थानकात स्वतंत्र रेल्वे पोलिस ठाणे सुरू करण्यात आले.
रेल्वेतील प्रवाशांना आता नवे बळ
रत्नागिरी स्थानकात रेल्वेचे स्वतंत्र पोलिस ठाणे; ऑनलाईन उद्घाटन
नव्या स्थानकात
- अधिकारी - ४
- पोलिस कर्मचारी - ६०
रत्नागिरी, ता. २३ : कोकण रेल्वेस्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. येत्या काही दिवसांत कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वेस्थानकात रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याचे आजच ऑनलाईन उद्घाटन झाले. या रेल्वे पोलिस ठाण्यात सध्या चार पोलिस अधिकारी आणि ६० पोलिस कर्मचारी असणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेची, प्रवाशांच्या मालाची आणि रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षादलाकडे (आरपीएफ) आहे, तसेच रेल्वेस्थानके, रेल्वे परिसर, उपनगरीय मार्गावरील गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे असणार आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते पनवेल, कसारा, खोपोली आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणूरोडपर्यंतची हद्द ही मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाकडे आहे, तर रोहानंतर कोकणातील रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची, रेल्वे परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षादल आणि स्थानिक पोलिस ठाण्याची आहे; परंतु गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. दुचाकी चोरी, सोनसाखळी खेचणे, मारामारी, खून अशा घटना वाढल्याने या ठिकाणी रेल्वे पोलिस ठाण्याची उभारणी करणे अत्यावश्यक होते. यासह कोकण रेल्वे प्रवासात महिलांशी संबंधित गुन्हे घडत असल्याने तत्काळ गुन्हा नोंद करून तपास करणे गरजेचे असते; परंतु कोकण रेल्वे हद्दीत गुन्हा घडल्यास त्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात करावी लागत होती.
त्यामुळे कोकण रेल्वेवरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाकडे दिली आहे. याबाबत शासनाकडून मान्यता मिळाली असून, आता रत्नागिरी रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिस ठाणे उभारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्वरित तक्रार करणे सोयीस्कर होईल. रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोलाड ते राजापूर रेल्वेस्थानकाचा भाग असेल तसेच, प्रत्येक स्थानकाच्या रेल्वे परिसराचाच भाग हद्दीत समाविष्ट केला आहे. त्यानंतर कोकण रेल्वेच्या स्थानकातील दोन्ही बाजूंनी ४०० ते ५०० मीटरचा भाग सोडल्यास उर्वरित भाग हा स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतच राहणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
-------------
चौकट...
कोलाड, विन्हेरे, रत्नागिरी, राजापूरची जबाबदारी
या पोलिस ठाण्याची हद्द ही रायगडमधील कोलाड रेल्वे स्थानक ते विन्हेरे रेल्वेस्थानक आणि रत्नागिरीमधील दिवाणखवटी रेल्वेस्थानक ते राजापूर रेल्वेस्थानकापर्यंत आहे. या ठाण्यात सुमारे १५० रेल्वे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा कार्यरत राहणार आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.