सातासमुद्रापार सादर होणार महिलांचे नमन

सातासमुद्रापार सादर होणार महिलांचे नमन

Published on

-rat२४p१९.jpg-
P२५N८६७३९
रत्नागिरी : आभार संस्थेचा रत्नभूषण पुरस्कार पालकमंत्री उदय सामंत यांना प्रदान करताना अरुण इंगवले. डावीकडून विनोद हळदवणेकर, डॉ. दिलीप पाखरे, अण्णा सामंत, साईनाथ नागवेकर, शरद गोळपकर, प्रेरणा नागवेकर. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
---
सातासमुद्रापार सादर होणार महिलांचे नमन
मंत्री उदय सामंत ः आभार संस्थेचा रत्नभूषण पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : कोकणच्या कलाकारांनी भजन, जाकडी, नमनाने कोकणची संस्कृती टिकवली आहे. तरुणांनी उच्च शिक्षण घेतले तरी त्यांना नमनात काम करण्याची लाज वाटू नये. मला दोन- चार महिने संधी मिळाली तर मी सुद्धा नमनात काम करेन. श्री रत्नागिरीच्या राजा मंडळातर्फे महिला भगिनींचे नमन आयोजित करू. तसेच या भगिनींची नमन कला सातासमुद्रापार नेण्यासाठी सर्व खर्चाची जबाबदारी मी घेतो, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचा रत्नभूषण पुरस्कार सामंत यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सामंत बोलत होते. स्वयंवर मंगल कार्यालयात कार्यक्रम झाला. सामंत म्हणाले की, रत्नभूषण पुरस्काराने मला राजकीय जीवनात काम करण्याची उर्जा दुप्पटीने वाढली आहे. महायुती सरकारने नोंदणीकृत भजन मंडळाला २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक कलावंतांना मानधन देण्याच्या कमिटीवर खेडशीचे नमन साता समुद्रापार नेणारे भिकाजी गावडे यांना अध्यक्ष केले आहे. त्यामुळे कलाकारांना न्याय मिळतोय.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चिपळूणच्या टिळक स्मारक ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष डॉ. अरुण इंगवले यांनी डॉ. सामंत यांना पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी अण्णा सामंत, आभार संस्थेचे अध्यक्ष विनोद हळदवणेकर, सल्लागार डॉ. दिलीप पाखरे, साईनाथ नागवेकर, प्रेरणा विलणकर, यशवंत वाकडे, वासुदेव वाघे, शरद गोळपकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर मायंगडे, प्रवीण सावंतदेसाई, दादा वाडेकर, राकेश बेर्डे, लक्ष्मीकांत हरयाणबुवा आदींनी मेहनत घेतली.

चौकट १
राज्याचे उद्दोग खाते सांभाळतोय...
सामंत म्हणाले की, आम्ही गाडीतून प्रवास करतो तेव्हा भजन, जाखडी, नमनातील गाणीच ऐकतो. त्यामुळे राजकारणातला नटवा कोण आहे. भस्मासूर कोण, रावणाचे गुण कोणामध्ये आहेत, कुठच्या माणसाला मोकळे सोडले पाहिजे. भले भले अंगावर आले तरी राज्याचे उद्योग खाते सांभाळतोय, अशी मिश्किल टिप्पणी डॉ. सामंत यांनी केली. तसेच मी नमनात काम केले तर मला राम करा व रावण कोणाला करायचे हे मी सांगतो, असे सांगताच सभागृहात हशा पिकला.

चौकट १
गुरुगौरव पुरस्कार
ज्येष्ठ भजनी कलाकार शैला करंदीकर, गिरीष विचारे, विश्वास करगुटकर, मिलिंद आरेकर, विनायक डोंगरे आणि विकास भाटकर यांना गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच पहिल्या महिला नमन कार्यक्रमातील कलाकार- प्रेरणा विलणकर, ज्योती कदम, रेश्मा शिंदे, पुनम गोळपकर, अर्चना मयेकर, रेखा खातू, विनया काळप, मनस्वी साळवी, सर्वता चव्हाण, रिमा देसाई, गीता भागवत, पूर्वा चव्हाण, समिक्षा वालम, आकाक्षा वायंगणकर, तन्वी नागवेकर, शीतल सकपाळ, जुई पावसकर, शोभना वरवटकर, शमिका विलणकर, वेदा शेट्ये, माधवी पाटील यांना सन्मानित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com