टिळक आळीचा जल्लोषात होणार शताब्दी गणेशोत्सव

टिळक आळीचा जल्लोषात होणार शताब्दी गणेशोत्सव

Published on

-rat२४p१५.jpg-
25N86785
रत्नागिरी : टिळक आळीच्या शतक महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
------
लोगो... येई गणेशा

जल्लोषात होणार टिळक आळीचा गणेशोत्सव
शंभरावे वर्ष ; संगीत, नाट्य, कीर्तन, भजनांचा होणार जागर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : टिळक आळीतील श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थानचा यंदा शंभरावा गणेशोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदा हा उत्सव अकरा दिवस होणार असून अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येणार आहे.
श्रींची पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत मिरवणूक २६ ऑगस्टला सायंकाळी ६ निघणार आहे. २७ ला पहाटे ६ वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना, रात्री ८.३० वाजता आरती मंत्रपुष्प, ९ वाजता महेशबुवा सरदेसाई यांचे कीर्तन, रात्री १०.३० वाजता राधा भट प्रस्तुत स्वर झंकार हा सुरेल गीतांचा कार्यक्रम सादर होईल. उत्सव काळात दररोज रात्री ९ वाजता आरती, मंत्रपुष्प होईल. २८ ऑगस्टला रात्री १० वाजता छू मंतर नाट्यप्रयोग मंडळातील कलाकार सादर करतील. २९ ऑगस्टला श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीत दिलेल्या गाण्यांचा तो राजहंस एक हा कार्यक्रम सादर होईल. ३० ऑगस्टला शनिवार असल्याने पारप्रासादिक चक्री भजन रंगणार आहे. रविवारी (ता. ३१) सायंकाळी ५ वाजता मंत्रजागर, रात्री १० वाजता श्रीरंग निर्मिती यु आर ग्रेट पप्पा हे दोन अंकी विनोदी नाटक सादर होणार आहे.
उत्सवात १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता टिळक आळी मर्यादित कराओंके कार्यक्रम सादर होईल. रात्री १० वाजता आळीतील बालदोस्त कलाकार विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करतील. २ सप्टेंबरला कलारंग प्रस्तुत धन्य धन्य ते टिळक हा अनोखा कार्यक्रम, ३ सप्टेंबरला रात्री १० वाजता शमिका- राधिका लाइव्ह हा कार्यक्रम रंगणार आहे. याच दिवशी सायंकाळी ४ वाजता महिला भगिनींचे अथर्वशीर्ष पठण होईल.

चौकट
७ सप्टेंबरला होणार विसर्जन
४ सप्टेंबरला रात्री १० वाजता पं. राम मराठे फाउंडेशनचे कलाकार संगीत मंदारमाला सादर करतील. ५ सप्टेंबरला रात्री १० वाजता रंगारंग क्रिएशन्स प्रस्तुत मी मराठी २.० हा कार्यक्रम आदिती पटवर्धन व सीमंतिनी करमरकर सादर करतील. शनिवार ता. ६ सप्टेंबरला सकाळी ८ वाजता सहस्रावर्तने, रात्री १० वाजता बक्षीस वितरण समारंभ व त्यानंतर पार प्रासादिक भजन सादर होईल. ७ सप्टेंबरला दुपारी १ वाजता श्रींची उत्तरपूजा करून सायंकाळी ५ वाजता श्रींची विसर्जन मिरवणूक सुरू होईल.

कोट
श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थानचा यंदा शंभरावा गणेशोत्सव साजरा होत आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. लोकमान्यांचा जन्म ज्या मधल्या आळीत म्हणजेच टिळक आळीत झाला. तिथेही हा उत्सव अत्यंत भक्तीभावाने, शिस्तबद्ध रितीने दरवर्षी साजरा होतो. यंदा उत्सवाचे दिवस वाढवले असून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
- शशिकांत काळे, अध्यक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com