मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे रत्नागिरीत शोरूम
- rat२५p१.jpg-
२५N८६८९८
रत्नागिरी ः फीत कापून मलाबारचे उद्घाटन करताना उद्योगमंत्री उदय सामंत, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, मलाबारचे अध्यक्ष एम. पी. अहमद आदी.
---
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे
रत्नागिरीत शोरूम सुरू
दागिन्यांचा अप्रतिम संग्रह; पश्चिम भारतातील ४६वे दालन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : प्रसिद्ध आणि विश्वसनीय सराफ पेढी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने रत्नागिरीत आपल्या पहिल्या शोरूमचे उद्घाटन दिमाखात केले. हे भव्य आणि आधुनिक शोरूम नवकर एन्क्लेव्ह, मारूती मंदिर, रत्नागिरी येथे तळमजल्यावर साकारण्यात आले आहे.
एकूण ४५०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या शोरूममध्ये ३६०० चौरस फूट जागेत दागिन्यांची विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. ग्राहकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा खरेदी अनुभव देणारे हे शोरूम खास डिझाईन केले असून, येथे पारंपरिक तसेच समकालीन अशा विविध शैलींतील दागिन्यांचा समृद्ध संग्रह उपलब्ध आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, मलाबार समुहाचे व्यवस्थापक, ग्राहक व हितचिंतक उपस्थित होते. रत्नागिरीतील हे शोरूम म्हणजे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे पश्चिम भारतातील ४६वे दालन असून, संपूर्ण भारतासह अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम आशिया या देशांतील एकूण ४००हून अधिक शोरूम्सचा भाग आहे. येथे सोन्याचे, प्लॅटिनम, चांदीचे तसेच रत्न व हिरेजडित दागिने विविध डिझाइन्समध्ये उपलब्ध असून, विविध अभिरुचीनुसार ते डिझाईन करण्यात आले आहेत.
चौकट
ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रित
मलाबार समुहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, रत्नागिरीत शोरूम सुरू करणे हे आमच्यासाठी विशेष औत्सुक्याचे आहे. या शहराचा समृद्ध वारसा आणि आधुनिकता यांचा उत्तम संगम आहे. आम्ही नेहमीच अपवादात्मक कारागिरी आणि दर्जेदार दागिने देण्यावर भर दिला आहे. ग्राहकांचे समाधान हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्ही रत्नागिरीतील ग्राहकांसाठी अविस्मरणीय खरेदी अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.