भाजपा महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे
rat२५p२१.jpg-
२५N८६९५४
मुंबई : भाजपतर्फे राखी प्रधान सोहळ्यात रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ, आशिष शेलार आदी.
भाजपच्या वर्षा ढेकणे यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : लाडक्या बहिणींकडून राखी प्रधान कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा ढेकणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे राखी प्रधान सोहळा मुंबईत झाला. त्या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ प्रमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रभर झाले. या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने कोकण ठाणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला तर राज्यातील ८० संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये तिसरा क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. हा मान मिळवण्यात रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा संघटनेचा पूर्ण जिल्ह्यामध्ये राखी संकलनाचे काम जोमात झाले, त्यात रत्नागिरी शहराने विक्रमी संख्येने राख्या जमा करून आघाडी घेतली. अकरा मंडळातूनही चांगले संकलन झाले.
या यशाचे सर्व श्रेय जिल्ह्यातील प्रत्येक मंडल अध्यक्ष, बूथप्रमुख व जिल्हा महिला मोर्चाच्या बळकट संघटनेला जाते. जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण सहभाग नोंदवला. या प्रसंगी नुपूरा मुळ्ये, श्रुती ताम्हणकर, शीतल रानडे, प्रभावती कानडे, अश्विनी वरवडेकर, रसिका देवळेकर, अनिता राजेशिर्के, जया केतकर, प्रियल जोशी, शीतल दिंडे, वैष्णवी चव्हाण, स्नेहा चव्हाण, धृवी लाकडे, सारिका भावे, सुचिता ढेकणे, श्रद्धा इंदुलकर, रूपाली कदम, पल्लवी पाटील, सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर, भक्ती दळी, रेणुका गुंडये यांसारख्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या तसेच या सर्वांनी जिल्ह्यात खूप मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.