-न्यायालयाची इमारत पूर्ण करून ताब्यात द्या
-rat२५p१७.jpg ः
P२५N८६९२५
मंडणगड ः न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करताना पालकमंत्री उदय सामंत.
-------
न्यायालयाची इमारत ताब्यात द्या
उदय सामंत ः आंबडवे गावाच्या विकासकामावर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २५ ः देशाचे सरन्यायाधीश व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पूर्ण न्यायव्यव्यस्थेच्या उपस्थितीत मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे १० सप्टेंबरपूर्वी तीन माळ्यांसह इमारतीचे पूर्ण काम करून इमारत ताब्यात द्या, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्याधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सामंत यांनी इमारतीच्या कामकाजाचा आणि न्यायालयाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणी कामाचा आढावा घेतला. नगरपंचायत मंडणगड येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हा अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, दापोलीचे प्रातांधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, नगराध्यक्षा ॲड. सोनल बेर्डे, तहसीलदार अक्षय ढाकणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अण्णा कदम, बार असोसिएशन मंडणगडचे अध्यक्ष ॲड. मिलिंद लोखंडे, कार्यकारी अभियंता सुखदेवे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत यांनी सात महिन्यांच्या विक्रमी वेळेत ६५ हजार चौरस मीटरची सुशोभीत इमारत उभी केल्याबद्दल बांधकामाच्या कामावर समाधान व्यक्त करताना संबंधित विभागाचे अभिनंदन केले. इमारतीबरोबर उद्घाटन सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पूर्वतयारीची त्यांनी माहिती घेतली. इमारतीचे कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. आंबडवे येथील मॉडेल कॉलेज व आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जागतिक दर्जाचे स्मारकांच्या निर्मितीच्या कामाच्या प्रगती व विविध समस्यांचा आढावा घेऊन विविध सूचना दिल्या.
चौकट
नगरपंचायतीला निधीची घोषणा
मंडणगड नगरपंचायतीचे इमारतीच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधीची घोषणा केली. इमारतीचे सुशोभीकरण व इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नगरपंचायतीने विकास आराखड्याची वाट न पाहता शहरात पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडे लक्ष द्यावे, अशा सूचना केली. रस्तेविकास व सांडपाणी व्यवस्थापनासाठी एक कोटी रुपयांच्या विकासनिधीची घोषणा केली याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळातून ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.