कणकवली : निवड

कणकवली : निवड

Published on

आयनल सोसायटीच्या संचालकपदी
भालचंद्र साटम बिनविरोध
कणकवली,ता. २५ ः तालुक्यातील आयनल येथील श्री नागेश्वर सोसायटीच्या रिक्त संचालकपदी भालचंद्र बाजीराव साटम यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या कार्यालयात आज विशेष सभा घेण्यात आली यावेळी ही निवड जाहीर करण्यात आली.
आयनल येथील श्री नागेश्वर सोसायटीच्या संचालकांपैकी एक जागा रिक्त होती. या रिक्त झालेल्या संचालकपदासाठी आज निवडणुक घेण्याचे निश्चीत करण्यात आले होते. यावेळी संचालकपदासाठी भालचंद्र बाजीराव साटम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या संदर्भात निवडणुक निर्णय अधिकारी सुनिता भोगले यांनी तसे जाहीर केले. यावेळी रावजी चिंदरकर, सुधीर लाड, मनोहर चव्हाण, सुरेश मुणगेकर भगवान मसुरकर, प्रविण साटम, प्रकाश सावंत, दशरथ दहिबांवकर, सुशांत चव्हाण, भास्कर लोके, गीता चव्हाण, संगिता चव्हाण, माजी सरपंच बापु फाटक, दाजी ओटवकर, सचिव नंदकुमांर देऊलकर आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com