घरडा महाविद्यालयाला 6 पारीतोषिके
-rat२५p२५.jpg-
२५N८६९६५
चिपळूण ः मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात पारितोषिके मिळवणारे घरडा महाविद्यालयाचे विद्यार्थी.
-----------
‘घरडा’ महाविद्यालयास सहा पारितोषिके
युवा महोत्सव ; २० महाविद्यालयांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः मोरवंडे येथील ज्ञानदीप महाविद्यालयात झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या युवा महोत्सवात २० महाविद्यालयातील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी ४३ प्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. त्यात घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये ६ पारितोषिके पटकावली.
युवा महोत्सवात रांगोळी स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारात वैष्णवी शिर्के हिला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. शास्त्रीय वाद्य (स्वरवाद्य) वैयक्तिक प्रकारात श्रावणी सकपाळने प्रथम तर गंधर संकपाळ यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. वक्तृत्व स्पर्धेत (इंग्रजी) गट ब मधून सलोनी म्हाडलेकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारामध्ये मनस्वी शिरकर हिने द्वितीय पारितोषिक मिळवले. भारतीय लोकनृत्य या प्रकारात पारंपरिक गुजराती गरबा या नृत्यप्रकाराला द्वितीय पारितोषिक मिळाले.
या सांघिक प्रकारामध्ये सई दळवी, सुहानी इंदुलकर, श्रुती शिर्के, निकिता नारखेडे, रूतिका पाटील, सिद्धी राजेशिर्के, मनस्वी शिरकर, श्रुतिका सावंत, वैष्णवी उगवे, रिद्धी जोशी तर साथीदार म्हणून सोहन चव्हाण व श्रावणी संकपाळ यांचा सहभाग होता. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे, सर्व प्राध्यापक आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---