मालगुंडमध्ये रंगला श्रावणधारा कार्यक्रम

मालगुंडमध्ये रंगला श्रावणधारा कार्यक्रम

Published on

-rat२५p२८.jpg-
P२५N८६९८७
रत्नागिरी ः मालगुंडमध्ये झालेल्या श्रावणधारा कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गौरव करताना गजानन पाटील.
-----

मालगुंडात रंगला श्रावणधारा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः तालुक्यातील मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा, कवी केशवसुत स्मारक आणि कोमसापची युवाशक्ती दक्षिण कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारकात आयोजित श्रावणधारा कार्यक्रमात वर्षाऋतू, श्रावण, पाऊस आदी विषयांवर कविता सादर करण्यात आल्या. यामध्ये परिसरातील शाळा-हायस्कूलमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
मालगुंड येथे झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविवर्य केशवसुत यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. संतोष केळकर, कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर, सचिव विलास राणे, सहसचिव रामानंद लिमये, कोषाध्यक्ष रवींद्र उर्फ भाऊ मेहेंदळे, सदस्या उज्ज्वला बापट, वैभव पवार आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com