विमा परताव्याची ३६,४६८ बागायतदारांना प्रतिक्षा

विमा परताव्याची ३६,४६८ बागायतदारांना प्रतिक्षा

Published on

-rat२२p२२.jgp-
२५N८६९५५
राजापूर ः प्रतिकूल हवामानामुळे सुरुवातीला आंब्याचा फुलोरा असा काळा पडला होता.
-------
परताव्याची ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा
अखेरच्या उत्पादनावर फेरले पाणी; १८ हजार ३४ हेक्टरला विमा संरक्षण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे यावर्षी आंबा-काजू बागायतदारांना चांगलाच फटका बसला आहे. अडीच महिने झाले तरीही ३६ हजार ४६८ बागायतदारांना विमा परताव्याची रक्कम मिळालेली नाही. यंदा मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या मुसळधार पावसाने शेवटच्या टप्प्यातील उत्पादनावर पाणी फेरले गेले. या परिस्थितीत नुकसान भरपाई सोडाच, विमा परतावाही दिला न गेल्याने बागायतदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नैसर्गिक आपत्तीत दिलासा मिळावा म्हणून आंबा-काजू बागायतदारांसाठी केंद्र शासनाने विमा योजना लागू केली आहे. त्याचा फायदा गेल्या काही वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. यंदा जिल्ह्यातील ३६ हजार ४६८ बागायतदारांनी सुमारे २ हजार ८५२ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला आहे. त्यात ३० हजार १३५ आंबा बागायतदारांनी १४ हजार ३८८ हेक्टरवरील तर ६ हजार ३३३ बागायतदारांनी काजूचा ३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. जिल्ह्यातील १८ हजार ३४ हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले आहे.
आंबापिकाला यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागला. अवकाळी पाऊस, त्यानंतर पडलेली कडाक्याची थंडी आणि अतिउष्मा या साऱ्या प्रतिकूल स्थितीमुळे यंदा आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. सतत कमी-जास्त राहिलेल्या दरामुळे आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. हंगामाच्या शेवटी मे महिन्यात झालेल्या वादळी पावसाने उरल्यासुरल्या आशांवरही पाणी फेरले गेले. आंबा बागायतदार आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे. दुसऱ्या बाजूला काजूचीही तशीच स्थिती आहे. काजूला प्रतिकूल वातावरण, अवकाळी पाऊस या संकटांसह विविध किडींचा प्रादुर्भाव झाला होता. काजूचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले. या प्रतिकूल स्थितीत बागायतदारांना विमा परताव्याचा मोठा आधार आहे. अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही विमा परताव्याची रक्कम बागायतदारांना मिळालेली नाही. त्यामुळे बागायतदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दृष्टिक्षेपात...
* वातावरणातील बदलाचा आंबा उत्पादनाला फटका
* २ हजार २४४ हेक्टर क्षेत्रावरील आंबा विमा उतरवला
* ६०७ हेक्टर क्षेत्रावरील काजू विमा उतरवला

कोट
यावर्षीच्या प्रतिकूल हवामानाचा आंबा बागायतदारांना चांगलाच फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून बागायतदारांनी विमा उतरवला होता; मात्र, त्याचा शासनाकडून अद्यापही परतावा मिळालेला नाही.
- ओंकार प्रभूदेसाई, आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com