-खेळघरमध्ये गणेशाचे आगमन

-खेळघरमध्ये गणेशाचे आगमन

Published on

-rat२५p३४.jpg-
P२५N८७०४३
रत्नागिरी ः बियाणी बालमंदिर भिडेआजी खेळघरमध्ये बाप्पाचे स्वागत करताना कार्याध्यक्षा नमिता कीर.
----
बियाणी बालमंदिरात गणेशाचे आगमन
रत्नागिरी, ता. २६ ः भारत‌ शिक्षण मंडळ संचलित बियाणी बालमंदिरमध्ये ढोलताशांच्या गजरात गणेशाचे आगमन झाले. बालगोपालांनी लेझिम खेळत वाजतगाजत गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.
भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी गणपती बाप्पाला औक्षण केले. सुंदर मखरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले. राजेंद्र कदम, विनायक हातखंबकर, संतोष कुष्टे, श्रीकृष्ण दळी, संजय चव्हाण, धनश्री मुसळे, आयुषी विचारे यांनी हरितालिका गणपती आणि गौरीचे पूजन केले. आरती, भजन, गजर म्हणून बाप्पाची आळवणी करण्यात आली. संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिंदे आणि पालक भगिनी यांनी लेझीमचे सादरीकरण केले.

Marathi News Esakal
www.esakal.com