-रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस ठाणे
- rat२५p३५.jpg-
P२५N८७०४४
रत्नागिरी ः गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस ठाण्याचे उद्घाटन करताना जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे.
रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वेस्थानकावर गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) ठाणे सुरू केले असून, त्याचे उद्घाटन आज करण्यात आले. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ५० पोलिस कर्मचारी आणि १०९ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाला व्हर्च्युअल माध्यमातून राज्याचे जीआरपी महासंचालक प्रशांत बुरडे आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा, पोलिस अधीक्षक नितीन बागटे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट, रेल्वे पोलिस उपायुक्त प्रज्ञा जेजे, सहाय्यक आयुक्त (रेल्वे पोलिस) निलिमा कुलकर्णी आणि पोलिस निरीक्षक प्रवीण पाडवी उपस्थित होते.
---