देवगडातील कॅरम स्पर्धेत योगेश कोळी, केतकर प्रथम

देवगडातील कॅरम स्पर्धेत योगेश कोळी, केतकर प्रथम

Published on

87212

देवगडातील कॅरम स्पर्धेत
योगेश कोळी, केतकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ ः येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेतील खुल्या गटात योगेश कोळी तर शालेय गटात पूर्वा केतकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्यांना आयोजकांतर्फे बक्षिस देऊन गौरवण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील हनुमान युवक क्रीडा मंडळच्यावतीने प्राथमिक शिक्षक भवनमध्ये खुल्या व शालेय गटातील कॅरम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन दत्तात्रय बलवान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विलास रूमडे, सचिव शरद लाड, इंद्रनील कर्वे उपस्थित होते. खुल्या गटातील सर्व पारितोषिके प्रकाश गोगटे यांनी पुरस्कृत केली होती तर शालेय गटातील सर्व पारितोषिके मंडळाच्यावतीने देण्यात आली. स्पर्धेचे बक्षीस वितरण मंडळाचे अध्यक्ष विलास रूमडे, सचिव शरद लाड, माजी अध्यक्ष विजय जगताप, सदस्य विनोद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक करून आभार श्री. रूमडे यांनी मानले. सूत्रसंचालन श्री. लाड यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. रूमडे, श्री. लाड, श्री. जगताप, श्री. मेस्त्री, शिवप्रसाद पेडणेकर, इंद्रनील कर्वे, योगेश कोळी, मेषक राणे, मनीष दळवी, सुशील रूमडे यांनी मेहनत घेतली. स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा, खुला गट -योगेश आनंदा कोळी, चित्तरंजन गोविंद बाणे, उत्तेजनार्थ मनीष दळवी व विकास कुलकर्णी, शालेय गट -पूर्वा दीपक केतकर, अवधूत प्रकाश पाटणकर, उत्तेजनार्थ मोझम झुबेर होलसेकर व वेदांत संतोष नाईकधुरे.
........................
87213

वामनराव महाडिक विद्यालयास
माजी विद्यार्थ्यांतर्फे टेबल-खुर्च्या
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ ः येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या १९८८-८९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला टेबल व खुर्च्या भेट दिल्या. माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या विकासात असलेला वाटा लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेत करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य अविनाश मांजरेकर, शाळा समिती सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच ८८-८९ च्या बॅचमधील विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी शाळेला भेटवस्तू दिल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. माजी विद्यार्थी सुहास पिसे यांनी शाळेच्या प्रगतीसाठी पुढील काळात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचा मानस व्यक्त केला. तर माजी विद्यार्थी सदाशिव पांचाळ व राजेश माळवदे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहायक शिक्षक सचिन शेटये यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com