गणपती विशेष रेल्वे गाड्यातून मुंबईकर दाखल

गणपती विशेष रेल्वे गाड्यातून मुंबईकर दाखल

Published on

-rat२६p२०.jpg-
२५N८७१९६
रत्नागिरी ः रेल्वेस्थानकावर चाकरमान्यांचे स्वागत केले जात आहे.
-rat२६p२८.jpg-
२५N८७२२२
रत्नागिरी ः रेल्वेस्थानकावर काढण्यात आलेली रांगोळी;
-----
रोषणाई, रांगोळ्यांनी चाकरमान्यांचे स्वागत
विशेष रेल्वेगाड्यांतून मुंबईकर दाखल; स्थानकावर माहिती केंद्र
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांना कोकणात घेऊन जाण्यासाठी कोकण रेल्वेमार्गावर यंदा ३७८ फेऱ्यांची घोषणा झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या गणपती स्पेशल रेल्वेगाड्यांतून मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात दाखल होऊ लागले आहेत. कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांच्या स्वागतासाठी रेल्वेच्या सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अनेक स्थानकात आकर्षक रांगोळी काढत गणेशभक्तांचे स्वागत केले जात आहे.
स्थानकांमध्ये स्वागतकक्ष, भजनी मंडळींसाठी विशेष रंगमंच उभारले गेले आहेत. स्थानिकांना आपली उत्पादने विकता यावीत यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पूजासाहित्य व प्रसाद यांचे विशेष स्टॉल उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापर्यंत जाहीर झालेल्या निम्म्याहून अधिक गाड्या कोकणात दाखल होत असून, यातील काही गाड्या खेड, सावंतवाडी, मडुरेपर्यंत तर काही गाड्या पुढील स्थानकांपर्यंत धावणार आहेत. कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाने आपला अधिकचा कर्मचारीवर्ग विविध स्थानकात बुकिंग काउंटर व माहितीकेंद्रासाठी तैनात करत प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली आहे. काही स्थानकांमध्ये स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून मोफत पाणीवाटप करण्याची व्यवस्था रेल्वेस्थानकात करण्यात आली आहे.
कोकण रेल्वेच्या १६ स्थानकात राज्यशासनातर्फे आरोग्यपथके तैनात केली गेली आहेत. रत्नागिरी, चिपळूण, कणकवलीसारख्या स्थानकात स्थानकाबाहेरील गर्दी व वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपाययोजना प्रशासनाकडून केल्या गेल्या आहेत. मुंबईतून कोकणातील स्थानकात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांना त्यांच्या गावी पोहोचवण्याकरिता कोकण रेल्वे आणि परिवहन विभागात समन्वय ठेवत काही गाड्या स्थानकातून फिरवण्यात आल्या आहेत तर ट्रेनच्या आगमनाच्या वेळेवर विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

चौकट
पोलिसांचा बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफची पथके तैनात झाली असून, रेल्वे सुरक्षा बलाचे १२५ कर्मचारी आणि अधिकारी, लोहमार्ग पोलिसांचे ४८ पोलिस कर्मचारी, पाच अधिकारी आणि १०९ होमगार्ड या काळात सुरक्षेची खबरदारी घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com