खारेपाटणमध्ये भाजपतर्फे चाकरमान्यांना चहा-बिस्कीट

खारेपाटणमध्ये भाजपतर्फे चाकरमान्यांना चहा-बिस्कीट

Published on

swt2626.jpg
87258
खारेपाटण ः चाकरमान्यांसाठी भाजपतर्फे चहा, बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली.

खारेपाटणमध्ये भाजपकडून
चाकरमान्यांना चहा-बिस्कीट
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ : गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भाजपतर्फे उद्योजक सतीश गुरव पुरस्कृत स्वागत कक्षाचे उद्घाटन कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी मुंबईहून येणाऱ्या गणेशभक्तांना चहा-बिस्कीटची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, शिवसेना कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, सुधीर कुबल, प्रवीण लोकरे, नंदकिशोर कोरगावकर, इस्माईल मुकदम, किरण गुरव, तेजस राऊत, मोहन पगारे, सुकांत वरुणकर, संतोष पाटणकर, संकेत शेट्ये, गुरुप्रसाद शिंदे, लियाकत काझी, अशपाक हाजू, जितेंद्र खामकर, महिला कार्यकर्त्या आरती गाठे, शेखर शिंदे, शेखर कांबळी आदी उपस्थित होते. एसटी चालक व वाहकांचा भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून चहा-बिस्कीट वाटप करण्यात आले.
...
swt2627.jpg
87259
खारेपाटणः तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदकिशोर कोरगावकर यांचा सत्कार करताना सरपंच प्राची इसवलकर, महेंद्र गुरव आदी.

खारेपाटण तंटामुक्त समितीचे
अध्यक्ष कोरगावकरांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर कोरगावकर यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरपंच प्राची इसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २५) ग्रामपंचायतीची सभा झाली. यावेळी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी नंदकिशोर कोरगावकर यांची अध्यक्षपदी निवड केली. सरपंच इसवलकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष कोरगावकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपसरपंचमहेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, जयदीप देसाई, किरण कर्ले, सुधाकर ढेकणे, अस्ताली पवार, शितिजा धुमाळे, धनश्री ढेकणे, पोलिसपाटील ओंकार चव्हाण, मंगेश गुरव, महेश कोळसुलकर, संतोष पाटणकर, सुधीर कुबल, संकेत शेट्ये यांसह प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, महिला बचतगटाच्या प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com