विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा गौरव
-ratchl२६२.jpg ः
P25N87328
चिपळूण ः दै. सकाळचे बातमीदार नागेश पाटील यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरवताना शहराध्यक्ष शशिकांत मोदी, सतीश कदम.
---
चिपळुणात रंगले काव्यसंमेलन
मराठी साहित्य परिषद ; गुणवंताचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः मराठी साहित्य परिषद आणि मराठी समाचारच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याचवेळी निमंत्रितांच्या कवी संमेलनात नामवंत कवींनी एकाहून एक कविता सादर करत संमेलनात अधिक रंगत आणली.
शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. नामवंत लेखक, कवी, निवेदन, शाहीर, संपादक आदी विविध भूमिका लिलया निभावणाऱ्या शाहीद खेरटकर हे गेल्या काही वर्षापासून समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देणाऱ्यांचा शोध घेत त्यांना पुरस्कार देऊन गौरव करत आहेत. यावर्षी मोहम्मद हुसेन मुसा यांना सह्याद्री साहित्यप्रेमी पुरस्कार, दै. सकाळचे नागेश पाटील यांना आदर्श पत्रकार, गोपाळ कारंडे (गीतरत्न), जुवराज जोशी (बालगंधर्व), सतीश जोशी (लोककला रत्न), इब्राहीम वांगडे (समाजरत्न), स्वप्ना यादव (नारीशक्ती), डॉ. मनिषा वाघमारे (नारीशक्ती), नीलेश पवार (कीर्तनकार), कवी सफरअली इसफ (काव्यसंग्रह), चैतन्य जोगले (बाल कलारत्न), लांजा येथील राजेश गोसावी (महेशकुमार स्मृती पुरस्कार), प्रशांत आदवडे (उत्कृष्ट समालोचक) यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शाहीद खेरटकर यांच्या कार्याचे कौतुक केले. मुख्याधिकाऱ्यांसह भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, डॉ. वाघमारे, आयरे महाराज आदींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कवी संमेलनात संजय कदम, जमालुद्दीन बंदरकर, संदीप येल्ये, जयवंत चव्हाण, माधुरी खांडेकर, अथर्वी चव्हाण, प्रतीक गमरे, अजमल दलवाई, अनुराधा कांबळे, वैभववाडी येथील सफरअली इसफ हे सहभागी झाले होते. नामवंत कवींनी विविध विषयावर कविता सादर केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.