सुदैवी ठसाळेंनी जिंकली सोन्याची नथ
-rat२६p२७.jpg-
२५N८७२२१
चिपळूण : होम मिनिस्टर सुदैवी ठसाळे यांच्याबरोबर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, भाऊ काटदरे आदी.
--------
सुदैवी ठसाळे यांनी जिंकली सोन्याची नथ
चिपळूण होम मिनिस्टर स्पर्धा; वसुंधरा पाटीलांना मानाची पैठणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ : चिपळूण नगरपालिका व सह्याद्री निसर्गमित्र, नाटक कंपनीतर्फे आयोजित प्लास्टिकमुक्त चिपळूण होम मिनिस्टर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व ‘होम मिनिस्टर’चा खेळ सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झाला.
या खेळात लकी ड्रॉमधून वसुंधरा पाटील यांना मानाची पैठणी मिळाली तर सर्वाधिक ३८.५ किलो प्लास्टिक जमा करून १५४ कुपन मिळवणाऱ्या स्वप्नाली निवाते या दुसऱ्या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. अटीतटीच्या होम मिनिस्टर खेळातून सुदैवी ठसाळे या सोन्याच्या नथच्या मानकरी ठरल्या.
प्लास्टिकमुक्तीसाठी महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. प्रत्येक १ किलो प्लास्टिकमागे महिलांना ४ कुपन देण्यात आले. शहरातील तब्बल ३००हून अधिक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला व एकूण १७४१ किलो प्लास्टिक जमा झाले. यामध्ये १५ पेक्षा जास्त कुपन मिळवणाऱ्या १९२ महिलांमध्ये ‘प्लास्टिकमुक्त चिपळूण होम मिनिस्टर’ हा खेळ घेण्यात आला. रत्नागिरी येथील लोककलावंत सुनील बेंडखळे यांनी या खेळात रंगत आणली. लकी ड्रॉमधून जयंत साडी सेंटरने प्रायोजित केलेली मानाची पैठणी वसुंधरा पाटील यांना मिळाली. १००पेक्षा जास्त कुपन मिळवणाऱ्या महिलांना जिव्हाळा मार्ट, काविळतळी यांच्याकडून प्लास्टिकपासून अप् सायकल बनवलेल्या आकर्षक शॉपिंग बॅग देण्यात आल्या. आसिफ तुरूक, जयश्री आंबेकर, कविता मिर्लेकर, तेजस्विनी किंजलकर, रूपाली आवले व साक्षी लोटेकर या महिलांनी १००पेक्षा जास्त कुपन मिळवले. एकूण १०९ महिलांना १५ कुपन मिळवता आले नाहीत. त्यांच्यासाठी स्वतंत्र लकी ड्रॉ काढण्यात आला. यातून सानिका पडवेकर, अश्विनी भुस्कुटे व फैमिदा शेख या भाग्यवान महिला ठरल्या. त्यांना नगर परिषदेच्यावतीने अपसायकल पद्धतीने बनवलेल्या शॉपिंग बॅग भेट देण्यात आल्या.
सोहळ्याला आमदार शेखर निकम, अभिनेते ओंकार भोजने, मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.