तरेळेत महागाईमुळे गणेशभक्तांना फटका
swt2636.jpg
87321
तळेरे ः बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी केलेली गर्दी. (छायाचित्र ः निकेत पावसकर)
तरेळेत महागाईमुळे
गणेशभक्तांना फटका
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ : येथील आठवडी बाजार आज गजबजला; मात्र अधूनमधून पावसाच्या आगमनाने विक्रेते आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. उद्या (ता. २७) गणेशचतुर्थी, ऋषी पंचमी आणि हरितालिका पूजन या सणांसाठी गणेशभक्तांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती; मात्र महागाईची झळ सर्वांनाच जाणवली.
नवविवाहितांसाठी गणपती आणि गौरी आवाहनाला भरण्यात येणारा ओवसा महत्त्वाचा सण असतो. यासाठी लागणारी सुपे, रोवळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले होती; मात्र २५० रुपयांना एक सूप विक्रीसाठी होते, तर शहाळी शंभर रुपयांवर पोहोचली होती. जवळपास सर्वच वस्तूंनी महागाईचा उच्चांक गाठल्याचे चित्र होते. सफरचंदे २०० ते २५० रुपये किलो, पाच प्रकारची फळे २०० रुपयांना विक्रीस उपलब्ध होती. नारळाने ४० पासून ६० रुपयांपर्यंत विक्रीला होते. भाज्यांचे दरही कडाडल्याने गणेशभक्तांना याचा फटका बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.