फोटोसंक्षिप्त-कोकणरत्न पुरस्काराने प्रकाश चिलेंचा सन्मान

फोटोसंक्षिप्त-कोकणरत्न पुरस्काराने प्रकाश चिलेंचा सन्मान

Published on

swt275.jpg
87455
डोंबिवली ः प्रकाश चिले यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

कोकणरत्न पुरस्काराने
प्रकाश चिलेंचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २७ः ओटवणे तथा बावळाट परिसरातील प्रसिद्ध भजनी बुवा मुंबईस्थित प्रकाश चिले यांनी संतपरंपरेचा वारसा जतन करीत संगीत व भजनक्षेत्रात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल अखिल कोकण विकास महासंघ आणि अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीतर्फे त्यांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डोंबिवली समाजमंदिर येथे आयोजित कार्यक्रमास अखिल कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष तानाजी परब, सचिव डॉ. अमित लोखंडे, कार्याध्यक्ष मनीष दाभोलकर, खजिनदार सुनील अस्टीव्हकर, लोकसेवा समिती अध्यक्ष तथा भाजप पश्चिम मंडळ उपाध्यक्ष रामचंद्र ऊर्फ बाळा परब आदी उपस्थित होते. चिले यांनी भजनकला जोपासताना संगीतक्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले.
भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या या कलेची दखल घेऊन त्यांना कोकणरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी चिले यांनी, आपल्या या जडणघडणीत गुरूंसह या क्षेत्रांतील सहकारी तसेच संगीत व भजन रसिकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरल्याचे सांगत आभार मानले.
...................
swt276.jpg
87456
सावंतवाडी ः कॅरम स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित मान्यवर.

तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत
‘मदर क्विन्स’ स्कूलचे यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यात १७ वर्षांखालील वयोगट मुलींमध्ये तनिष्का पडवळ हिने तृतीय, १७ वर्षांखालील वयोगट मुलांमध्ये सुबोध नाईक याने पाचवा, १४ वर्षांखालील वयोगट मुलींमध्ये सौम्या हरमलकर हिने द्वितीय, महिमा गवंडर हिने चतुर्थ क्रमांक, १४ वर्षांखालील वयोगट मुलांमध्ये मंथन पास्ते याने पाचवा क्रमांक पटकावला.
या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, क्रीडाशिक्षक भूषण परब, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ कार्यकारी समिती सदस्यांनी अभिनंदन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com