मच्छीमार संघ, ग्रामस्थांतर्फे वाघ कुटुंबियांना आर्थिक मदत

मच्छीमार संघ, ग्रामस्थांतर्फे वाघ कुटुंबियांना आर्थिक मदत

Published on

swt279.jpg
87459
मेढाः बुडून मृत्यू झालेल्या जितेश वाघ यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये किमतीची मुदत ठेवीची कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली.

मच्छीमार संघ, ग्रामस्थांतर्फे
वाघ कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : महिनाभरापूर्वी समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या मेढा येथील मच्छीमार जितेश वाघ यांच्या कुटुंबीयांना दांडी स्थानिक मच्छीमार संघ, मेढा स्थानिक रहिवासी व मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे आर्थिक सहाय्य करण्यात आले. मृत वाघ यांच्या तिन्ही मुलांच्या नावे २ लाख रुपये मुदत ठेव त्यांच्या पुढील शिक्षणासाठी ठेवण्यात आली.
यामध्ये मेढा स्थानिक रहिवाशांतर्फे १ लाख ५० हजार ६०० रुपये, दांडी मच्छीमार संघाकडून २५ हजार रुपये व मातृत्व आधार फाउंडेशनकडून २४ हजार ४०० रुपये असे २ लाख रुपयांचे सहाय्य करण्यात आली. ही रक्कम वाघ यांच्या मुलांच्या नावे मुदत ठेव म्हणून ठेवण्यात आली. त्यांचे कागदपत्र जितेश वाघ यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी संतोष लुडबे, महेश कांदळगावकर, दादा वेंगुर्लेकर, नरेश हुले, विकी चोपडेकर, संजय गावडे, मनोज खोबरेकर, संतोष चव्हाण, भाऊ मोर्जे, प्रमोद मोहिते, प्रा. आर. एन. काटकर, नितीन मांजरेकर, उमेश सांगोडकर, सदा चुरी, उदय मोंडकर, राजा इब्रामपूरकर, नुपूर तारी, रोहित जोशी, श्री. मंडलिक आदी उपस्थित होते.
..................
swt2710.jpg
87449
मालवणः ‘सुवर्णतुला’ कीर्तन सादर करताना विवेक वायंगणकर.

‘सुवर्णतुला’ कीर्तनातून
मालवणमध्ये प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : चातुर्मास कीर्तनमालेचे चौथे पुष्प एकादशीला विवेक वायंगणकर यांनी ‘सुवर्णतुला’ या विषयावर कीर्तन करून गुंफले. पूर्वरंगात ‘साठविला हरी हृदय मंदिरी’ हा संत तुकारामाचा अभंग घेतला.
‘भगवंत खूप दूर आहेत; परंतु भक्ती करून भगवंताला प्राप्त करू शकतो,’ असे त्यांनी सांगितले. उत्तररंगात ‘सुवर्णतुला’ या विषयावर कीर्तन करताना त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ पत्नी होत्या. त्यातील एक सत्यभामा हिला स्वतःवर गर्व झाला होता, त्याची जाणीव करून देण्यासाठी नारदमुनी तेथे प्रकट झाले आणि त्यांनी सत्यभामेस श्रीकृष्णाचे दान करण्याचे सांगितले; पण श्रीकृष्णास कोणी दान घेण्यास तयार नव्हते.
सोळा हजार एकशे सात पत्नींनी आपल्या जवळची सर्व सुवर्णभूषणे तराजूमध्ये ठेवली; परंतु पारडे काही हलेना. रुक्मिणी येतानाच तुळशीपत्र घेऊन येते. श्रीकृष्णाला व नारद मुनींना तीन प्रदक्षिणा घालून तुळशीपत्र पारड्यात ठेवून नमस्कार करते. तुलसी दल ठेवताच पारडे खाली जाते, ही कथा कथन केली. हार्मोनियम वादक महेश तळवडेकर व तबलासाथ सदा चुरी यांनी केली. कीर्तनाचे पुढील पुष्प १७ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० वाजता वीणा परब या ‘भक्त पुंडलिक’ विषयावर गुंफणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com