चिपळूणचा विसर्जन घाट सज्ज ठेवा

चिपळूणचा विसर्जन घाट सज्ज ठेवा

Published on

‘चिपळुणाचा विसर्जन
घाट सज्ज ठेवा’
चिपळूण : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पालिकेने केलेल्या विविध तयारींचा आढावा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी घेतला. सर्व विभागप्रमुखांसमवेत आयोजित बैठकीत शहरातील स्वच्छता, सुरक्षा, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा तसेच विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्याधिकारी भोसले यांनी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, नगर अभियंता दीपक निबांळकर, विद्युत विभागप्रमुख संगीता तांबोळी, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर, नागरी सुविधा केंद्र प्रमुख वलीद वांगडे तसेच बांधकाम मेस्त्री रवी सातपुते यांच्यासह प्रत्यक्ष विसर्जन घाटांची पाहणी केली. विसर्जन घाटांवरील सर्व प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. काही ठिकाणी पूरक सुविधा उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. याबाबत तातडीने कार्यवाही करून आवश्यक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या.

लांजा बसस्थानक
प्रकाशाने उजळले
लांजा ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा बसस्थानक हायमास्टने प्रकाशले आहे. गेली अनेक वर्षे बसस्थानकावर असणारा अंधार होता. त्याचा त्रास कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना होत होता; मात्र आमदार किरण सामंत यांनी याबाबत पुढाकार घेऊन लांजा बसस्थानकामध्ये हायमास्ट बसवले. त्यामुळे बसस्थानक प्रकाशाने उजळले आहे.

मुस्लिम तरुणाकडून
आरती पुस्तक प्रसिद्ध
चिपळूण : शिरगाव येथील मुस्लिम समाजातील तरुण अरशद शेख यांनी हिंदू-मुस्लिम सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवत गणपती आरतीसंग्रह पुस्तक प्रसिद्ध केले आहे. भाजपचे नेते तसेच वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी साईमंदिर येथे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक नासीर खोत, प्रसाद यादव, हिदायत कडवईकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com