कर्ले आंबेशेत मिरवणूक

कर्ले आंबेशेत मिरवणूक

Published on

- rat२७p२४.jpg-
२५N८७४६९
रत्नागिरी ः गणेश चतुर्थीला बुधवारी (ता. २७) कर्ला-आंबेशेत गावच्या घरगुती गणपती मिरवणुकीत सुरुवातीला ढोलताशा पथकाने मिरवणुकीत जल्लोष निर्माण केला.
- rat२७p२५.jpg-
२५N८७४७०
रत्नागिरी ः मिरवणुकीत सहभागी भाविक.
- rat२७p२६.jpg-
२५N८७४७५
हातगाडीवर विराजमान झालेले गणराय.
- rat२७p२७.jpg-
२५N८७४७६
पावसाच्या शक्यतेमुळे प्लॅस्टिकने झाकलेली गणेशमूर्ती.
- rat२७p२८.jpg-
२५N८७४७७
मिरवणुकीमधील एक गणपती.
(छाया ः प्रसाद जोशी, रत्नागिरी)
---
‘कर्ला-आंबेशेत’ मिरवणुकीवर पर्जन्यासह पुष्पवृष्टी
१२० घरगुती गणपतींचा समावेश ; पारंपारिक पद्धतीने स्वागत, उत्साह टिपेला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : शहराजवळील कर्ला-आंबेशेत गावातील १२०हून अधिक घरगुती गणपतींचे बुधवारी (ता. २७) सकाळी भव्यदिव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. लक्ष्मीचौक येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. पावसाचे सावट असले तरीही ग्रामस्थांचा उत्साह दांडगा होता. सुमारे सहा तासानंतर ही मिरवणूक कर्ला, आंबेशेत गावात पोहोचली. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले तरुण, आकर्षक सजावटीने सजलेल्या गाड्यांमधून लाडक्या गणरायाला घरी नेण्यात आले.
कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणुकीचे हे ४०वे वर्ष होते. विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणुका निघतात; परंतु आगमनाची ही मिरवणूक नावीन्यपूर्ण आहे. दरवर्षीप्रमाणे दोन्ही गावच्या ग्रामस्थांची एकत्रित अशी दिमाखदार मिरवणूक काढली. अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध ही मिरवणूक सकाळी लक्ष्मीचौक येथून निघाली. मिरवणुकीमध्ये सुमारे सव्वाशेहून अधिक लहान-मोठ्या गणेशमूर्तींचा समावेश होता. विविध वाहने, ढोलताशे पथके, झांजपथक, महिला लेझिम पथक, शिवशक्ती चक्री भजन मंडळ या मिरवणुकीत लक्ष्यवेधी ठरले. जल्लोषी वातावरणात मिरवणूक सुरू झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यापासून गोखलेनाका, रामआळी, एसटी बसस्थानक, शासकीय रुग्णालय, निवखोल घाटी, आदमपूर, राजिवडा, मारुती मंदिर, कर्ला व श्री साईमंदिर आंबेशेत असा आगमन मिरवणुकीचा मार्ग होता.
या मिरवणुकीत गरुडावर बसलेला गणेश, शंकराच्या रूपातील निळ्या रंगात, गळ्यात साप असलेला गणेश, रामाची प्रतिमा असलेला गणपती, फेटेवाला गणपती अशा विविध प्रकारची गणरायाची रूपे या मिरवणुकीत पाहायला मिळाली. या प्रसंगी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पुष्पवृष्टी केली. पोलिसांचाही बंदोबस्त होता. माजी आमदार राजन साळवी यांनी मिरवणुकीत हजेरी लावली तसेच माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे, शेखर घोसाळे, प्रवीण वायंगणकर, भाई वायंगणकर, राजन भाटकर, मिरवणूक समिती अध्यक्ष महेंद्र सुर्वे, उपाध्यक्ष दीपक सुर्वे, मिलिंद हतपळे यांच्यासह कार्यकारी मंडळ, दक्षता समिती सदस्य, तरुण उत्साही मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.
-----
कोट
दरवर्षीप्रमाणे शिस्तबद्ध मिरवणूक झाली. मिरवणूक सुनियोजित व्हावी याकरिता सदस्यांसह ग्रामस्थांनी आणि वाहतूक व शहर पोलिस प्रशासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने मदत केली. गणरायांची आगमन मिरवणूक ही कर्ला-आंबेशेत गावचे वैशिष्ट्य आहे.
-दीपक सुर्वे, उपाध्यक्ष, मिरवणूक समिती

चौकट १
पावसातही उत्साह कायम
सकाळी हवामान कोरडे होते त्यामुळे भक्तगणांचा उत्साहही अधिक होता; मात्र कालांतराने ढगाळ वातावरण तयार झाले आणि पाऊस सुरू झाला. चारचाकीसह हातगाडीवर विराजमान झालेल्या मूर्ती तत्काळ प्लॅस्टिकने झाकण्यात आल्या. एक फुटापासून सुमारे चार फूट उंचीच्या मूर्ती या मिरवणुकीत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com