सिंधुदुर्गातील तरुणांचा दुबईत गणेशोत्सव
swt2719.jpg व swt2720.jpg
87549, 87550
दुबई ः शारजाह येथे गणेश चतुर्थी सण साजरा करताना सिंधुदुर्ग व गोवा येथील युवक. दुसऱ्या छायाचित्रात प्रतिष्ठापना केलेली गणेशमूर्ती.
सिंधुदुर्गातील तरुणांचा दुबईत गणेशोत्सव
१५ वर्षांची परंपराः गोव्यातील चाकरमान्यांचीही साथ
मदन मुरकरः सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २७ः सिंधुदुर्ग आणि गोव्यातील व्यवसायानिमित्त दुबईत स्थायिक चाकरमानी तेथे गेली बारा वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहेत. तेथील शारजाह येथे हे तरुण एकत्र येत हा आनंदोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात.
कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि उत्साहाने, आनंदाने साजरा होणारा सण आहे. गणेश चतुर्थी सणाच्या तयारीला आधीपासूनच सुरुवात होते. यात प्रामुख्याने घरची साफसफाई, रंगरंगोटी, सजावट, गणेशमूर्ती शाळेत जाऊन मूर्तीची निवड करणे, आरती, भजन यांची तयारी करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी मंडप, हालते देखावे, संदेश देणारे देखावे करण्यात युवा पिढी व्यस्त असते. व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारे कोकणी लोक गणेशोत्सवासाठी गावी परततात.
गणेशोत्सव कोकणामध्ये सामाजिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा सण मानला जातो. या सणामुळे लोक एकत्र येतात, नातेसंबंध दृढ होतात. सामाजिक एकोप्याने लोक एकत्र राहतात. गणेशोत्सव उत्सव म्हणजे कोकणातील सांस्कृतिक आणि चालीरीती जपण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. सिंधुदुर्गातील आणि गोव्यातील युवकांनी आपली रुढी परंपरा जपत गेली बारा वर्षे दुबई शारजाह येथे गणेश उत्सव सण मोठ्या जल्लोषात साजरा करत आहेत.
प्रथमच जेव्हा दुबई येथे गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरले, तेव्हा शेखर मांजरेकर, नारेश मांजरेकर, देवानंद वॉलवोईकर, अजित शेठगावकर, सुरेश परब यांनी २०१२ पासून गणेश चतुर्थी साजरी करण्यास सुरुवात केली. पहिली दोन वर्षे फक्त गणेश पूजन करायचे. त्यानंतर जेव्हा आपल्याकडच्या युवकांची संख्या वाढली, तेव्हापासून मोठ्या जल्लोषात मंडप, डेकोरेशन, महाप्रसाद, आरती, रात्री भजन करण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या परिसरात राहणारे सर्व युवक, मित्रपरिवार या दिवशी एकत्र येऊन गणेश चतुर्थी मोठ्या जल्लोषात साजरी करतात. तसे पाहिले तर गणेशोत्सव कोकणामध्ये धुमधडाक्यात साजरा केला जातो; मात्र कामानिमित्त परदेशी राहणाऱ्यांना याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग, गोव्यातील युवकांनी दुबई शारजाह येथे एकत्र येऊन गेली बारा वर्षे दरवर्षी गणेशोत्सव उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. सर्वच युवक या ठिकाणी एकत्र येत गणेशमूर्ती, सजावटी पासून मूर्तीपूजन, नैवद्य, भजन, फुगड्या आदी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करतात आणि परदेशी राहून सुद्धा आपल्या रुढी-परंपरा जपताना दिसतात. कामानिमित्त परदेशी राहणाऱ्यांना दर वेळी गावी येता येत नाही. अशावेळी परदेशी राहणारे सिंधुदुर्ग आणि गोव्यातील युवक दुबई-शारजाह येथे आपली परंपरा अबाधित राखण्यासाठी एकत्र येत गणेश चतुर्थी उत्सव सण साजरा करतात.
कोट
आम्ही गावी असताना गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करायचो. मला कामानिमित्त परदेशी म्हणजे दुबई येथे जाण्याचा योग आला; मात्र माझे पूर्ण लक्ष गावीच असायचे. त्यात करून गणेश चतुर्थी आली की, आपल्या गावच्या बाप्पाकडे लक्ष असायचे. गावातील सण हे आपली पारंपरिक रुढी, परंपरा जतन करत आहेत, ते पाहून मनाला समाधान वाटायचे. दुबई येथे असल्याने दरवर्षी गावी येता येत नाही. त्यामुळे मित्रपरिवार एकत्र येत गावातील सण, उत्सव साजरे करत आहोत. गेली बारा वर्षे परदेशात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करून आनंद घेत आहोत.
- सौरभ नाईक
कोट
बाहेरगावी राहूनही गणेश चतुर्थी साजरी करायला मिळते, हे आमचे भाग्यच मानतो. आम्ही सर्वजण मिळून दुबईत गणेश चतुर्थी साजरी करत आहोत, याचा अभिमान वाटतो. सर्वांनी एकोप्याने राहत आपली संस्कृती जपावी.
- शुभम मुळीक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.