माजी विद्यार्थी संघाची शिडवणे शाळेत स्थापना

माजी विद्यार्थी संघाची शिडवणे शाळेत स्थापना

Published on

swt2735.jpg
87610
शिडवणेः येथील क्रमांक १ शाळेत माजी विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले.

माजी विद्यार्थी संघाची
शिडवणे शाळेत स्थापना
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २७ ः मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ (ता. कणकवली) येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे काम सुरू झाले आहे. १९३९ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेचा गौरवशाली इतिहास असून अनेक पिढ्यांचे विद्यार्थी शाळेतून बाहेर पडून विविध क्षेत्रांत कार्यरत झाले आहेत.
माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी शाळेच्या वतीने समर्पित व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर शाळेतील उपक्रम आणि घडामोडींची माहिती नियमित दिली जात असून जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक माजी विद्यार्थी शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत असून थेट शाळेशी संपर्क साधत आहेत. या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी अधिकारी पदांवर कार्यरत असल्याने त्यांच्या सहकार्यामुळे शाळेच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गणेश चतुर्थीच्या सुट्ट्यांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक विविध वाड्यांमध्ये भेट देऊन माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. भोवडवाडी, गावठणवाडी, बौद्धवाडी, टक्केवाडी, पाटणकरवाडी आणि पाष्टेवाडी येथून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, तर सुतारवाडीतील माहिती संकलनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पदाधिकारी स्वतः सहभागी होत असून माजी विद्यार्थीही मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सर्वांचा सहभाग यामुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्याध्यापकांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com