सरंबळ हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश
swt284.jpg
87694
सरंबळ ः चिन्मयी टेमकरचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक अनिल होळकर व अन्य.
सरंबळ हायस्कूलचे
क्रीडा स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ः तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकतीच आवळेगाव हायस्कूल येथे जल्लोषात पार पडली. स्पर्धेत इंग्लिश स्कूल सरंबळ या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. दहावीतील चिन्मयी टेमकर हिने बुद्धिबळ स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
हर्ष रेडकर, श्रेयस परब, हर्ष टेमकर, शौर्य परब, गार्गी करलकर, अपूर्वा कदम यांनी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन घडविले. विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक संतप्रसाद परब यांचे मुख्याध्यापक अनिल होळकर यांनी अभिनंदन केले. यावेळी सरंबळ ग्रामस्थ समता संघ, मुंबईचे सरचिटणीस राजेंद्र परब, संस्थेचे शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, चिटणीस प्रसाद साटम यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.