-नो पार्किंगचे फलक शोभेचे बाहुले

-नो पार्किंगचे फलक शोभेचे बाहुले

Published on

ग्राऊंड रिपोर्ट---लोगो

-rat२८p१०.jpg-
२५N८७६८३
राजापूर ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरामध्ये झालेली वाहतूककोंडी.
-rat२८p११.jpg-
OP२५N८७६८४
राजापूर ः जवाहरचौकातील वाहतूककोंडी.
-rat२८p१२.jpg-
P२५N८७६८५
राजापूर ः छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या पुढील भागात झालेली वाहतूककोंडी.
-rat२८p१३.jpg-
२५N८७६८६
राजापूर ः बाजारपेठेतील छोट्या छोट्या गल्ल्यांमध्येही अशा पद्धतीने दुचाक्या उभ्या केलेल्या असतात.
--------
राजापूर शहर वाहतूककोंडीत अडकले
‘नो पार्किंग’चे फलक बनले शोभेचे बाहुले; प्रशासनाकडून ठोस कारवाईचा अभाव
राजेंद्र बाईत ः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ ः दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्‍यांची संख्या वाढत असताना मात्र, वाहनचालकांना शहरामध्ये वाहने पार्किंग करण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विविध कामाच्यानिमित्ताने शहरामध्ये मोठ्या संख्येने ये-जा करणाऱ्‍या लोकांना पार्किंगसाठी मोकळी वा नजीकची जागा उपलब्ध नसल्याने वाहनांची वर्दळ अन् गर्दीच्या रस्त्यावर, वाहतुकीच्या मुख्य रस्त्यासह बाजारपेठेमध्ये दुकानांच्यासमोर वाहने पार्किंग करून ठेवली जात आहे. शहरामध्ये दिवसागणिक वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याचवेळी शहराची भौगोलिक रचनाही वाहतूककोंडीला कारणीभूत ठरताना दिसत आहे. अनेकवेळा नो पार्किंग फलकांच्या खाली वाहने पार्किंग करून ठेवलेली असल्याने हे नो पार्किंगचे फलक केवळ शोभेचे बाहुले ठरताना दिसत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यासह जवाहरचौकामध्ये होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठोस उपाययोजनांची आखणी करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्याला वाहनचालकांसह नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसादाची आवश्यकता आहे.

*अशी होते वाहतूककोंडी
राजापूर शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, शहरामध्ये तालुक्याची प्रमुख शासकीय कार्यालयांसह वैद्यकीय सुविधा, राजकीय पक्षांची कार्यालये कार्यरत आहेत. त्याचवेळी शाळा, दवाखानेही शहरामध्ये मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून शासकीय कामासह अन्य विविध कामानिमित्ताने लोकांची नेहमीच ये-जा असते. शहरामध्ये कामानिमित्ताने येणारे अनेकवेळा स्वतःची वा भाड्याची वाहने घेऊन येतात; मात्र, शहरातील जिथे मोकळी आणि मोक्याची जागा दिसेल त्या ठिकाणी ही वाहने उभी करून ठेवतात. अनेकवेळा बाजारपेठेमध्ये वा नजीक मोक्याची वा मोकळी पार्किंगसाठी जागा नसल्याने बाजारपेठेमध्ये रस्त्यावर अनेकवेळा वाहनचालकांकडून वाहने उभी करून ठेवली जातात. रस्त्यावर एकाच ठिकाणी तासनतास ही वाहने उभी राहिल्याने एकप्रकारे वाहतूककोंडीला आमंत्रण मिळताना दिसते.

*रस्त्यावरच लावली जातात वाहने
शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेली बाजारपेठ आणि परिसरामध्ये वाहतूककोंडी असताना तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यासमोर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून ठेवलेली असल्याने या ठिकाणी अनेकवेळा वाहतूककोंडी होते. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस आणि गुरूवारी शहरामध्ये भरणारा आठवडा बाजार या दिवशी शासकीय कामांसह अन्य कामानिमित्ताने मोठ्या संख्येने येणाऱ्‍या लोकांकडून तहसील कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर वाहने उभी करून ठेवलेली असतात. ही वाहने या भागातील वाहतूककोंडीला कारणीभूत ठरतात. कोदवली नदीच्या काठावरील शिवाजीपथवर दोन्ही बाजूला रिक्षा, दुचाक्या, छोटे टेम्पो आणि माल उतरवण्यासाठी आलेल्या मोठ्या गाड्या पार्किंग करून ठेवलेल्या असतात. त्यामुळेही शिवाजीपथ रस्त्यावर अनेकवेळा वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.

*फलक केवळ शोभेचे बाहुले
ज्या भागामध्ये अनेकवेळा वाहतूककोंडी होते त्या भागामध्ये नगर पालिकेने नो पार्किंगचे फलक लावलेले आहेत; मात्र, या नो पार्किंग फलकाच्या खाली वा त्या ठिकाणी अनेकवेळा बिनदिक्कतपणे वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात. त्याच भागामध्ये वाहतूककोंडी होते. त्यातून, नो पार्किंगचे फलक तयार करणे आणि फलक उभारणीसाठी पालिकेकडून केला जाणारा खर्च फुकट जात आहे.

*ठोस उपाययोजनांची आवश्यकता
वर्षानुवर्षे भेडसावत असलेली शहरातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी नगर पालिका, पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजनांची आखणी होणे गरजेचे आहे. केवळ ठोस उपाययोजना करून उपयोग नाही तर त्याची सकारात्मक दृष्टिकोनातून अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याला वाहनचालकांसह ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसादही देणे गरजेचे आहे अन्यथा, वाहतूककोंडी फोडण्याच्या उपाययोजनाही चर्चेचा आणि संशोधनाचा विषय ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

*दृष्टिक्षेपात राजापूर शहर
क्षेत्रफळ - ६.१९ चौ.कि.मी.
लोकसंख्या- १० हजार ४९९
रस्त्यांची लांबी- ३७.२८२ कि.मी.

*वाहतूककोंडी होणारे भाग
जवाहरचौक परिसर
जवाहरचौक ते तालीमखाना
नगर वाचनालय ते अर्बन बँक परिसर
बाजारपेठ मुख्य रस्ता
मुन्शीनाका
तहसीलदार कार्यालय आणि पोलिस ठाण्यासमोरील रस्ता
शिवाजीपथ रस्ता

* हे उपाय गरजेचे
जवाहरचौक ते तालिमखाना या मुख्य रस्त्याचे रूंदीकरण
कोदवली नदीशेजारी पिचिंग केलेल्या गाळाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करणे
* जवाहरचौक-आयटीआय-हर्डीमार्गे-महामार्ग आणि
जवाहरचौक-शिवाजीपथ-वरचीपेठ पूल या पर्यायी रस्त्यांचा विचार होणे गरजेचे
* वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलिस यंत्रणा, नगर पालिका प्रशासन आणि वाहनचालकांची सकारात्मक भूमिका महत्त्वाची
* ज्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते त्या भागात विशेष लक्ष देणे गरजेचे

कोट ः
राजापूर शहरामध्ये शासकीय कामासह अन्य विविध कामानिमित्ताने ये-जा होते; मात्र, शहरामध्ये सुयोग्य पार्किंग व्यवस्था वा मोकळी जागा नसल्याने मिळेल त्या मोकळ्या जागेमध्ये वाहने नाइलाजास्तव उभी करावी लागतात. बाजारपेठेतील दुकानांपासूनही रस्ता खूप लांब आहे. अरुंद बाजारपेठेमध्ये वाहन नेणे मुश्कील होऊन जाते. अशावेळी बाजारपेठेमध्ये खरेदीला गेलेल्या लोकांनी वाहने उभी कुठे करायची?यासाठी सुयोग्य अशी पार्किंगची व्यवस्था होणे गरजेचे आहे.
- राकेश शिंदे, वाहनचालक
----
*वाहन चालकांच्या अपेक्षा
रस्त्यांचे रुंदीकरण आणि पर्यायी मार्गांची आवश्यकता
वाहनचालक, प्रशासन, नागरिकांचा समन्वयच कोंडीमुक्त शहराचा मार्ग
पार्किंगसाठी नियोजित जागांची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com