नामदेव शिंपी समाजाच्या सभागृहासाठी २५ लाख
- ratchl२९१.jpg-
२५N८७८७०
चिपळूण ः आमदार शेखर निकम यांचा सत्कार करताना श्री नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळाचे पदाधिकारी.
नामदेव शिंपी समाजाच्या सभागृहास २५ लाख
आमदार निकम ः वास्तू उभारण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ ः चिपळूण शहर हे सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहरातील श्री नामदेव शिंपी समाजाने स्वतंत्र सभागृहाची मागणी केली होती. त्यासाठी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या द्वारे समाजाच्या एकात्मतेचे आणि सांस्कृतिक उन्नतीचे प्रतीक ठरेल, अशी वास्तू उभारण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
नामदेव शिंपी समाजातील प्रतिनिधींबरोबर त्यांनी संवाद साधला. निवडणुकीच्या काळात आमदार निकम यांनी शिंपी समाजाला शब्द दिला होता. ते आश्वासन पाळत आमदार निकम यांनी नगरविकास विभागाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था योजनेंतर्गत सभागृह उभारणीसाठी २५ लाखांचा निधी मिळवून दिला आहे. याबद्दल श्री नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळातर्फे आमदार निकम यांचे आभार मानण्यात आले. चिपळूण येथील जनसंपर्क कार्यालयात जाऊन आमदार निकम यांचा समाजातील प्रमुख प्रतिनिधींनी सत्कार केला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष विवेक रेळेकर, सचिव संतोष होमकर, प्रसाद आवळे, अंकुश आवळे, प्रफुल्ल रेळकर, चेतना होमकर, विद्या रेळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.