दापोली सायन्स कॉलेजला ९ नामांकने

दापोली सायन्स कॉलेजला ९ नामांकने

Published on

- rat२९p७.jpg-
P२५N८७८६८
दापोली ः युवा महोत्सवामध्ये ९ मानांकने मिळवलेला अर्बन सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांच्या समवेत मानांकन प्राप्त विद्यार्थी.

‘दापोली सायन्स’ला नऊ पारितोषिके
आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव ; वादविवादमध्ये अव्वल कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २९ ः मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन ५८व्या युवा महोत्सवाच्या उत्तर रत्नागिरी विभागातील फेरीत दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजने ९ पारितोषिके प्राप्त करून विभागीय जनरल चॅम्पियनशिपमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.
मोरवंडे-बोरज (ता. खेड) येथील ज्ञानदीप महाविद्यालयात पार पडलेल्या विभागीय फेरीत नेहमीप्रमाणे साहित्य स्पर्धा प्रकारात ४ पारितोषिके मिळवत दापोली अर्बन बँक कॉलेजने आपला दबदबा कायम ठेवला. मराठी वादविवाद स्पर्धेत श्रुती साखळकर-पार्थ सामल या जोडीने तर इंग्रजी वादविवाद स्पर्धेत रसिका बर्वे-फरहा भार्दे या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच श्रुती साखळकर हिने मराठी वक्तृत्व स्पर्धेत व फरहा भार्दे हिने इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. संगीत स्पर्धा प्रकारात आयुष मुलुख याने पाश्चात्य वादन स्पर्धेत प्रथम तर शार्दुल आठल्ये याने तालवाद्य स्पर्धा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. फाईन आर्ट विभागात मातीकाम स्पर्धेत महेश मालगुंडकर याने प्रथम तर मेहेंदीमध्ये महेक रमजाने हिने द्वितीय क्रमांक पटकावला. याचबरोबर स्किट स्पर्धा प्रकारात महाविद्यालयाने प्रथेप्रमाणे पारितोषिक पटकावले. श्वेता मुलुख, महेश मालगुंडकर, समीक्षा टिकारे, ऋतुराज पवार, रितू खामकर, राधिका बर्वे, आयुष मुलुख, मंथन मुलुख, सोहम किजबिले या संघाला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com