शेर्पे गावातील ७९ निरक्षर झाले साक्षर

शेर्पे गावातील ७९ निरक्षर झाले साक्षर

Published on

swt298.jpg
87930
शेर्पे ः गावातील नवसाक्षर नागरिक.

शेर्पे गावातील ७९ निरक्षर झाले साक्षर
महिलांचा लक्षणीय सहभागः शिक्षकांसह स्वयंसेवकांच्या परिश्रमाला यश
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, दि. २९ : शेर्पे गावातील निरक्षरांचे २०२३ मध्ये केंद्रशाळा शेर्पे यांच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात ७९ असाक्षर नागरिकांची नोंद झाली होती. यापैकी सर्वांनी आता साक्षरतेकडे यशस्वी पाऊल टाकले असून परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
भारत सरकारने २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत निरक्षरांना साक्षर करण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रशाळा शेर्पे व शेर्पे माध्यमिक विद्यालयातील शिक्षकवृंद, स्वयंसेवक यांच्या सहकार्याने गावातील सर्व निरक्षरांना साक्षर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक दशरथ शिंगारे व हिदायत अत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी करण्यात आली.
साक्षर झालेल्यांमध्ये ९५ टक्के महिला तर ५ टक्के पुरुष आहेत. यामुळे महिलांच्या शिक्षणाबाबतची जागरूकता अधोरेखित झाली आहे. या मोहिमेत शिक्षक तुषार तांबे, योगिता बंडगर, मोहिनी पाटील, अमरीन शेख, कविता हरकुळकर, शांतीलाल कापसे, रंजना राणे, शितल कुलकर्णी, पोर्णिमा भागवडे यांनी मार्गदर्शक म्हणून विशेष परिश्रम घेतले. तर स्वयंसेवक म्हणून महिमा शेलार, तस्मिया मनाजी, रजिया जैतापकर, फरीदा रमदुल, स्वरा पाटणे, मंगेश गुरव तसेच हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी योगदान दिले.
शेर्पे गावाने ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल निरंतर शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग यांच्यावतीने गावाचे अभिनंदन करण्यात आले. तसेच जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, माध्यमिक गटशिक्षणाधिकारी कविता शिंपी, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, विस्ताराधिकारी रामचंद्र नारकर व केंद्रप्रमुख संजय पवार यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com