दादरपर्यंत तीन रेल्वे धावणार

दादरपर्यंत तीन रेल्वे धावणार

Published on

दादर, ठाण्यापर्यंत
तीन रेल्वे धावणार
रत्नागिरी ः मध्यरेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्र. १२ आणि १३च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्यांच्या सेवांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत काही लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादर स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट होणार आहेत. त्यामुळे मंगळूर जंक्शन-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकावर, मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादर स्थानकावर तर मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी दादर स्थानकावर थांबणार आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेने केले आहे. प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होईल.

घेरारसाळगडकरांनी
बुजवले खड्डे
खेड : तालुक्यातील घेरारसाळगड गावातील पेठवाडी, तांबडवाडी व बौद्धवाडीतल्या ग्रामस्थांनी रविवारी श्रमदान करून आवळीचा पेडा ते रसाळगड किल्ला बसस्टॉपदरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात साईडगटारे गाळाने भरल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असून, मोठमोठे खड्डे तयार झाले होते. त्यामुळे एसटी वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. जिल्हा परिषद बांधकाम विभागाला लेखी तक्रार देऊनही शासनाने अद्याप दखल घेतली नाही. अखेर ग्रामस्थांनी पुढाकार घेत रस्ता तात्पुरता दुरुस्त करून वाहतुकीसाठी मोकळा केला. या श्रमदानात नारायण सावंत, दगडू सावंत, शिवाजी सकपाळ, शांताराम सावंत, धोंडिराम आखाडे, गजानन सावंत, सुभाष सावंत, अनंत सकपाळ, रामचंद्र सावंत, रामचंद्र आखाडे, परशुराम जाधव, सुरेश सावंत, रामचंद्र सावंत आदी ग्रामस्थांचे योगदान राहिले.

फिनोलेक्सच्या
विद्यार्थ्यांची निवड
रत्नागिरी ः फिनोलेक्स अॅकॅडमीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधी मिळवत यशाची नवी नोंद केली आहे. इलेक्ट्रोमेक या आंतरराष्ट्रीय कंपनीत अॅकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रिकल विभागातील दीक्षिता मिठबावकर, रिया सावंत, अमेय भाटकर, आदित्य बाळ, मेकॅनिकल विभागातील मोहम्मद गडकरी यांचा समावेश आहे. इलेक्ट्रोमेक ही आशियातील इंडस्ट्रिअल ओव्हरहेड क्रेन्स निर्मिती करणारी कंपनी आहे. सलग चार वर्षे ग्रेट प्लेस टु वर्क म्हणून निवड झाली आहे. या कंपनीत पाच विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. फिनोलेक्स अॅकॅडमीने मागील शैक्षणिक वर्षात (२०२४-२५) ३००हून अधिक विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वीरीत्या प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com