माभळेतील १९२ वर्षे जुना गणेशोत्सव

माभळेतील १९२ वर्षे जुना गणेशोत्सव

Published on

-rat२९p३.jpg-
२५N८७८६४
संगमेश्वर ः माभळे येथील मंदिरातील गणेशमूर्ती.
------
माभळेत गणेशोत्सवाला
१९२ वर्षांची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २९ ः संगमेश्वरजवळील माभळे येथील गणपती मंदिराला १९२ वर्षांचा इतिहास आहे. आता श्री गणपती मंदिराची देखभाल करत असलेले प्रभाकर भिडे यांची ही पाचवी पिढी आहे. यांच्या घराशेजारील जागेवर खासगी मंदिर आहे. आज काळानुरूप देवळाची रचना बदलली आहे.
या मंदिराची स्थापना (कै.) गंगाधरराव भिडे यांनी छोटीशी घुमटी बांधून केली. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या म्हणजेच (कै.) सदाशिवराव, (कै.) पुरुषोत्तमराव व (कै.) नारायणराव यांनी अखंड श्रीगणेशाची सेवा केली. दरवर्षी श्रीगणेश चतुर्थीचा उत्सव गौरी-गणपती विसर्जनापर्यंत साजरा केला जातो. याबरोबरच या मंदिरात गौरीपूजनादिवशी (हवसतात त्या दिवशी) गावातील महिला भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच, या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या माताभगिनी मंगळागौरीतील खेळ खेळून साजरा करतात. या मंदिराविषयी अधिक माहिती सांगताना प्रभाकरपंत यांनी सांगितले, की मंदिर स्थापन केले तेव्हा छोटीशीच घुमटी होती, जी काही काळानंतर सुधारून मंदिर स्वरूपात आणली. भिडे स्वतःची एसटीमधील नोकरी सांभाळून सेवेत कधीही खंड पडू दिला नाही. मंदिरात गणपतीव्यतिरिक्त शिवशंकर, हनुमान, संतोषीमाता, दत्तगुरू अशा एकूण पाच देवी-देवतांची स्थापना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com