तेऱ्ये मधलीवाडी ग्रामस्थांनी घेतली आमदार निकम यांची भेट
तेऱ्ये मधलीवाडी ग्रामस्थांनी
आमदार निकमांची घेतली भेट
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील तेऱ्ये मधलीवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेऊन गावातील पायाभूत सुविधा सोडवण्याविषयी मागणी केली. आमदार निकम यांनी त्या समस्या तातडीने सोडवू, असे आश्वासन दिले तसेच विकासकामांबाबतही सविस्तर चर्चा केली. या वेळी दिलीप भुरवणे, रणजीत गोमाणे, किरण भुरवणे, प्रदीप भुरवणे, आत्माराम गोमाणे, सीताराम गोमाणे, चंद्रशेखर गोमाणे, पर्शुराम गोमाणे, साहिल भुरवणे, यतेंद्र भुरवणे, अभिजित गोमाणे, नीलेश भुरवणे, सुरज गोमाणे, दयानंद जाधव, मंगेश भुरवणे, सुरेंद्र बडंबे, सुभाष भुरवणे, महेंद्र बडबे, सिद्धेश गोमाणे, संदीप भुरवणे, प्रभाकर भुरवणे, सुनील भुरवणे, अशोक गोमाणे, शांताराम बडंबे, अनेश भुरवणे, संकेत जाधव, गजानन भुरवणे, प्रणय भुरवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मेजर ध्यानचंद
जयंतीनिमित्त कार्यक्रम
साडवली ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात हॉकीचे जादूगार, ऑलिंपियन मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी एनसीसी कमांडर प्रा. उदय भाट्ये, प्रा. धनंजय दळवी, मीता भागवत, अजिंक्य रेडीज, प्रिया कुलकर्णी आदी उपस्थित होते. शिरीष फाटक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मेजर ध्यानचंद यांनी भारताला १९२८, १९३२ आणि १९३६ या तीन ऑलिंपिकमध्ये एकहाती विजय मिळवून दिल्याचे सांगितले. खेळ व खेळाचे आरोग्याच्यादृष्टीने महत्त्व, खेळातील करिअरच्या संधी याबाबत थोडक्यात आढावा त्यांनी सादर केला. कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा विभाग समन्वयक प्रा. धनंजय दळवी यांनी केंद्र शासनाने २०१२ पासून प्रारंभ केलेल्या राष्ट्रीय क्रीडादिनाचा उद्देश विशद केला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी वर्गांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऑलिंपियन मेजर ध्यानचंद यांच्याविषयीच्या माहितीपटांची लिंक, माहितीपूर्ण लेख, केंद्र शासनाच्या क्रीडाविषयक धोरणे व योजनांची माहिती, ऑलिंपियन मेजर शांताराम जाधव यांच्या विषयीची माहिती पाठवण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी साहाय्यक महेंद्र पवार, स्वप्नील कांगणे, सुहास गोपाळ व अमोल वेलवणकर यांनी मेहनत घेतली.
मोटारवाहन निरीक्षकांचा
सप्टेंबरमध्ये तालुका दौरा
दापोली : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटारवाहन निरीक्षकांचा सप्टेंबर २०२५ मधील तालुका शिबिर दौरा जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. चिपळूणला ९, १६, २३ आणि ३० सप्टेंबर, खेड तालुक्यात ४ आणि १८ सप्टेंबर, दापोलीत ३ आणि १७ सप्टेंबर, मंडणगड १० सप्टेंबर, गुहागर ११ सप्टेंबर, देवरूख २४ सप्टेंबर, लांजा २५ सप्टेंबर आणि राजापूर २६ सप्टेंबर रोजी शिबिर भरवण्यात येणार आहे. या शिबिरावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार, संबंधित कामकाज पार पाडले जाणार असून जनतेला आवश्यक सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.