पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवा
swt306.jpg
88168
कुडाळ ः सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (छायाचित्रः अजय सावंत)
पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवा
हुस्नबानो खलिफे ः कुडाळात काँग्रेसतर्फे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या पाहिजेत, तरच कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस हुस्नबानो खलिफे यांनी येथे केले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला
सिंधुदुर्ग काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काँग्रेस कमिटीत नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन येथील मराठा समाज हॉलमध्ये करण्यात आले. सुरुवातीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक विकास सावंत यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत नव्याने नियुक्त करण्यात आलेले सरचिटणीस रमेश कीर, हुस्नबानो खलिफे, साईनाथ चव्हाण यांचा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
श्रीम. खलिफे यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची मी माहेरवाशीण असल्याने हा माझा घरचा सत्कार आहे. पक्ष संघटनेत मागे काय झाले याचा विचार न करता वर्तमानात व भविष्यात काय केले पाहिजे, असे सांगितले. साईनाथ चव्हाण यांनी, सगळ्या तालुक्यांचे अध्यक्ष राष्ट्रवादीत गेले; पण मी निष्ठेने काँग्रेससोबतच रहिलो. पक्षाचे काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केल्यामुळे पक्षाने माझा सन्मान करून सरचिटणीस पद दिले आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडीन, असे विचार मांडले.
रमेश कीर यांनी, स्वातंत्र्यानंतरच्या ७८ वर्षांच्या काळात काँग्रेसने अनेक चढउतार बघितले आहेत. काँग्रेस पुन्हा नक्कीच उभारी घेईलच; परंतु आपण पक्षासाठी काय योगदान देतो, याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपला विभाग किंवा गाव सक्षम करण्याच्या दृष्टी प्रयत्न करायला पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
अॅड. दिलीप नार्वेकर, प्रकाश जैतापकर, विलास गावडे, नागेश मोर्ये, विजय प्रभू, मेघनाद धुरी, रवींद्र म्हापसेकर, प्रवीण वरुणकर, विनायक मेस्त्री, चंद्रशेखर जोशी, केतनकुमार गावडे, महेंद्र सांगेलकर, विधाता सावंत, जेम्स फर्नांडिस, प्रदीप मांजरेकर, भालचंद्र जाधव, विभावरी सुकी, राघवेंद्र नार्वेकर, सुंदर सावंत, आय. वाय. शेख, अमोल सावंत, बाळा धाऊसकर, बाळासाहेब नंद्दीहळ्ळी, विद्याप्रसाद बांदेकर, तबरेज शेख, महेश परब, तौसीफ शेख, अजिंक्य गावडे, विजय खाडे, संदेश कोयंडे, हेमंत माळकर, समीर वंजारी, सुधीर मल्हार, सुंदरवल्ली स्वामी, महेंद्र मांजरेकर, संदीप सुकी, आनंद परुळेकर, संतोष मुंज, दादा नेवरेकर, व्ही. के. सावंत, उल्हास शिरसाट, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा फर्नांडिस, बाळा शिरोडकर, विरेश देऊलकर, बाबा चव्हाण आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.