''तांबळडेग शिक्षणोत्कर्षक''तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

''तांबळडेग शिक्षणोत्कर्षक''तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Published on

swt3012.jpg
88174
तांबळडेग : मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

‘तांबळडेग शिक्षणोत्कर्षक’तर्फे
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० : तालुक्यातील तांबळडेग येथील शिक्षणोत्कर्षक संस्थेच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी संगणकीय ज्ञान आत्मसात करून त्यामध्ये कौशल्य दाखवत प्रगती साधण्याचे आवाहन समारंभाध्यक्ष पुंडलिक येरागी यांनी यावेळी केले.
मुंबई स्थित तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेतर्फे आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना येरागी यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. मुंबई अध्यक्ष विलास कुबल यांनी, संस्थेचे मुंबई कार्यालय अद्यावत स्वरुपात आकाराला येत असल्याचे सांगून विद्यार्थिनींनी चांगले यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. प्रा. राजेश राजम, प्रमोद कांदळगावकर, मुक्तद्वार वाचनालयाचे अध्यक्ष दिगंबर येरागी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष सागर सनये, मुख्याध्यापक सदाशिव फाले, सहशिक्षक रामनाथ गोसावी, तुकाराम तथा नाना मोंडकर, गणपत सादये, गणपत राजम, मुंबई चिटणीस हरिश्चंद्र कोचरेकर, खजिनदार दत्तात्रय धावडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सीताराम तथा काका मुणगेकर यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश सादये यांनी केले.
.....................
swt3013.jpg
88175
सावंतवाडी ः आयुष्मान कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘आयुष्मान’ शिबिरास
सावंतवाडीत प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३०ः शहरातील वैश्यवाडा येथे उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या आयुष्मान कार्डसाठी आज आयोजित केलेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वैश्यवाडा येथील म्हापसेकर अपार्टमेंट येथे झालेल्या या शिबिरात वयवंदन कार्डसाठी २० व आयुष्मान भारत कार्डसाठी ३४ असे एकूण ५४ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात डॉ. सोनाली शेंडगे, आरोग्यमित्र सारा राऊळ यांनी कामकाज केले. शिबिरासाठी दीपक म्हापसेकर यांनी सहकार्य केले.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com