-साखरप्यात अश्वारूढ गणेशांची स्थापना, दीडशे वर्षांची परंपरा

-साखरप्यात अश्वारूढ गणेशांची स्थापना, दीडशे वर्षांची परंपरा

Published on

-rat३०p७.jpg
P२५N८८१४०
ःसाखरपा : सरदेशपांडे यांचा अश्वारूढ गणेश.
----
साखरप्यात अश्वारूढ गणेशमूर्तींची परंपरा
मराठेशाहीशी थेट नाते असलेली घराणी ; लाकडी अश्वाची जपणूक
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३० : साखरपा-कोंडगाव या परिसरात अश्वारूढ गणेशमूर्तींची स्थापना सन्मानाने करण्यात आली आहेत. मराठेशाहीशी थेट नाते असलेल्या घराण्यांमधील ही परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे.
गणपतीचे वाहन हे उंदीर; पण साखरपा कोंडगाव परिसरातील सरदेशपांडे, अभ्यंकर, केळकर, केतकर, रेमणे, नावाथे, जोगळेकर, गद्रे, पोंक्षे, शिंदे या घराण्यांच्या घरी घोड्यांवर विराजमान झालेल्या गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. ही घराणी मराठेशाहीच्या काळात विशाळगडावर अधिकारी होती. सरदेशपांडे घराण्याकडे हे विशाळगड सुभ्यातील गावांच्या महसूल वसुलीचे अधिकार होते तर अभ्यंकर हे पागा सांभाळत असत. केळकर हे दिवाण होते तर केतकर कुटुंबाकडे सुभेदारी होती. रेमणे हे ग्रामोपाध्ये होते. या घराण्यांना साखरपा आणि परिसरातील गावांमध्ये जमिनी इनाम मिळाल्या होत्या. मराठेशाहीचा अस्त झाला, इंग्रजांचे साम्राज्य वाढीस लागल्यावर या कुटुंबांचे अधिकार लोप पावले आणि चरितार्थासाठी ही कुटुंबे गडउतार झाली. गडावरून येताना ते घोड्यावरून आले म्हणून त्यांचे गणपती घोड्यांवरून आणण्याची प्रथा सुरू झाली.
सुरुवातीला या घराण्यांकडे लाकडी अश्व होते. सरदेशपांडे, केळकर, पोंक्षे यांच्याकडे हे लाकडी अश्व आहेत. त्यांच्या गणेशमूर्ती त्याच अश्वावर काढल्या जातात. त्यासाठी या घराण्यांमधील अश्व हे नागपंचमीला मूर्तिकारांकडे नेऊन देण्याची परंपरा आहे. त्यानंतर मूर्तिकार थेट त्या अश्वांवरच मूर्ती तयार करतात. रेमणे, नवाथे, अभ्यंकर, जोगळेकर यांचे अश्व आजही सुस्थितीत आहेत; पण आता त्यांवर गणपती काढणे, अश्वारूढ गणेशमूर्तिकारांकडून आणणे, विसर्जन करणे हे कठीण होत चालल्याने त्यांनी मातीच्या अश्वासह मूर्ती आणण्यास प्रारंभ केला आहे. बुधवारी सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्ताने या सगळ्या घरांमध्ये अश्वारूढ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com