पडवे तंटामुक्त अध्यक्षपदी गडदे
पडवे तंटामुक्ती
अध्यक्षपदी गडदे
गुहागर : तालुक्यातील पडवे येथील ग्रामपंचायतची १५ ऑगस्टची तहकूब ग्रामसभा सरपंच मुजीब जांभारकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या सभेत जमा-खर्चाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेविका सौ. पाटील यांनी ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर आणि विकासकामांविषयी सरपंच जांभारकर यांनी सविस्तर उत्तरे देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी नवीन तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून विलास गडदे यांची निवड करण्यात आली. श्री. गडदे हे परिसरात सर्वांच्या अडी-अडचणीला तत्परतेने धावून जाणारे तसेच सर्वांशी सलोख्याचे संबंध जपणारे म्हणून परिचित आहेत. त्यांचे सरपंच मुजीब जांभारकर आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
खरे-ढेरे महाविद्यालयात
काव्य वाचन स्पर्धा
गुहागर : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती विभागातर्फे खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या मराठी, भाषा मंडळातर्फे ‘श्रावणधारा’ या विषयावर स्वःलिखित कविता वाचन स्पर्धा पार पडल्या. या काव्यवाचन स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व मेडल प्रधान करण्यात आले. तर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानिमित्ताने मान्यवर कवींनी एकापेक्षा एक कविता सादर केल्या. श्रावणातील पावसाचे वेगळेपण या कवितांमधून व्यक्त मांडण्यात आले. कोमसाप गुहागर शाखेचे सचिव श्री. हलगरे यांनी श्रावण कवितेमधून श्रावणातील मनमोहक बदलांचे वर्णन केले. तर मोहन पाटील यांनी कवितेच्या निर्मितीबाबत माहिती दिली. अरुण मोर्ये यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आला श्रावण बाई ग काव्याचं वाचन केले. यानंतर प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी आपल्या बालकवीतेचे कवितेचे वाचन केले.
रेवानदी ते पिंपळवट
रस्त्याचे उद्घाटन
गुहागर ः तालुक्यातील रेवानदी ते पिंपळवट रस्त्याचे उद्घाटन गुहागरचे आमदार व शिवसेना नेते भास्कर जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक विनायक मुळे, शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायत सरपंच समीत घाणेकर, उपसरपंच विठ्ठल धावडे, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सरपंच विजय तेलगडे, खामशेत ग्रामपंचायत सरपंच मंगेश सोलकर, प्रशासकीय सचिव महेश गोवळकर, शिवसेना महिला विभाग प्रमुख सिद्धी सुर्वे, शिवसेना विभाग प्रमुख शरद यादव, ज्येष्ठ समाजसेवक नरेश धावडे, शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग सोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तलवारबाजी
स्पर्धा उद्या
सावर्डे ः रत्नागिरी जिल्हा फेन्सींग असोसिएशनने ३ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडागंणावर होणार आहे. निवड चाचणी व स्पर्धा संध्याकाळी ४ वाजता सुरू होईल. इच्छुक खेळाडूंनी क्रीडा प्रकाराचे साहित्य व वयाच्या मूळ दाखल्यासह उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनच्या सचिव समिधा संजय झोरे यांनी केले आहे. या स्पर्धेतून जिल्हा संघाची निवड केली जाईल. १९ वर्षे वयोगटातील राज्य ज्युनिअर तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा भंडारा येथे २६ ते २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत जन्मतारीख १ जानेवारी २००६ नंतर जन्मलेले मुले व मुली सहभागी होऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.