श्री देव भैरी मंदिर देखावा
rat३१p२०.jpg-
25N88649
रत्नागिरी : घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा प्रथम विजेता मिरजोळे येथील श्री देव भैरी मंदिराचा देखावा.
मिरजोळे येथील श्री देव भैरी मंदिर देखावा प्रथम
घरगुती गणपती सजावट स्पर्धा ; ११५ स्पर्धकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : घरगुती गणपती सजावट स्पर्धेत मिरजोळे येथील आशिष वाडकर आणि परिवाराने हुबेहूब साकारलेला श्री देव भैरी मंदिर देखावा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. द्वितीय क्रमांक मिरजोळे येथील राहुल पाडावे यांच्या संत एकनाथ महाराज देखाव्याला आणि तिसरा क्रमांक संतोष कडू यांच्या रेड्यामुखी वेद, संत ज्ञानेश्वर देखाव्याला जाहीर झाला आहे.
छायाचित्रकार कांचन मालगुंडकर आयोजित कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेत ११५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रचंड पाऊस असूनही स्पर्धकांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षकांनी गणपती सजावट, देखाव्यांचे परीक्षण केले. स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष होते. इकोफ्रेंडली सजावट व देखव्यांना प्राधान्य देत परीक्षकांनी निकाल जाहीर केला आहे. प्रथम क्रमांकाला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ६ हजार रुपये आणि सर्वांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. परीक्षक मंडळात कांचन मालगुंडकर, नरेंद्र पाटील, अभिजित नांदगावकर, विजय पाडावे, विजय बासुतकर, नीलेश जगताप, मुकुंद पिलणकर, शकील गवाणकर, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर, अजिंक्य सनगरे आदींचा समावेश होता. याबाबत कांचन मालगुंडकर म्हणाले, गणेशभक्तांनी अगदी मनोभावे सजावट व पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक असे विविध देखावे सादर केले. गणेशभक्तांनी असे देखावे, सजावट तयार करावी, हे प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
चौकट १
सविस्तर निकाल
सुबक गणेशमूर्ती - साईराज वाडकर (लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे), वामन सुवारे (फगरवठार, साळवी बंधू देखावा). विशेष उल्लेखनीय - चारुदत्त धालवलकर (केदारनाथ देखावा, गावखडी), संजय वर्तक (शाळा दुरुस्ती देखावा, कुवारबाव), तरळ बंधू (सुंभ सजावट, भाट्ये), संदीप मेस्त्री (लोंगेवाला युद्ध, जयगड), जीवन कोळवणकर (मत्स्यावतार, कुवारबाव), श्रीपाद शिवलकर (जीवन क्षणभंगूर, बसणी), मयूर भितळे (सांबरे हॉस्पिटल, सोमेश्वर), सुहानी गोताड (शिवकालीन देखावा, कोतवडे). उत्तेजनार्थ पारितोषिक - कौस्तुभ आंबेकर (केदारेश्वर, मिरजोळे), सलोनी शेलार (पर्यावरणाचा सन्मान, रत्नागिरी), रमेश माचकर (झाडे जगवा, शिरगांव), शशांक शिंदे (गड-किल्ले, वेतोशी), दीपिका कुबल (वारली पेंटिंग, बंदररोड, किल्ला). प्रोत्साहनपर पारितोषिक ः वेद लोंढे (शिवपिंडी, शिरगांव), स्वप्निल ठिक (कल्पवृक्ष, शिरगांव), अविनाश शिंदे (जेजुरी, जांभरूण), यश कानडे एकवीरा आई, फणसवळे), चंद्रकांत माने (पंढरीची वारी, केळ्ये), मनोज भाटकर (मंदिर, भाट्ये), सर्वेश मेस्त्री (जि.प. शाळा बचाव, नाखरे).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.