SIILC - कोल्हापूर
सकाळ (कोल्हापूर) ता: ०१ सप्टेंबर, सोमवार प्रसिद्धीसाठी बातमी
कोल्हापूर, सांगली, बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आवृत्त्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी.
--------------------------------------------------------
कृतीतून शिका व्यावसायिक चटणी
कोल्हापूर, ता. ३१ : जीवनातील चव वाढवणाऱ्या खमंग स्वादिष्ट आणि रुचकर अशा विविध पद्धतीच्या व्यावसायिक चटणी कशा तयार कराव्या याविषयी मार्गदर्शन करणारी एक दिवसीय कार्यशाळा ११ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. महाराष्ट्रीयन जेवणामध्ये चटणी या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दररोजच्या आहारामध्ये चटण्यांचे सेवन केल्यामुळे त्यांचे आपल्या शरीराला बऱ्याचशा प्रमाणात मोठे फायदे होतात. या अनुषंगाने व्यावसायिक चटणी प्रशिक्षणामध्ये विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण चटण्या शिकवल्या जाणार आहेत. हे प्रशिक्षण पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून शिकवले जाणार आहे. त्याचप्रमाणे चटणी व्यवसाय कमी भांडवलामध्ये कसा सुरु करावा, व्यवसायाला असणारी मागणी, त्यामधील नावीन्यपूर्ण पद्धती व्यवसायामध्ये मिळणारा नफा याचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे चटणी टिकवण्याची पद्धत व पॅकिंग याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये सोलापुरी शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, लसूण चटणी, कढीपत्ता चटणी, कारले चटणी, टोमॅटो चटणी, कांदा चटणी, पांचाली चटणी, थ्री इन वन चटणी, आवळा चटणी, कोर्टा चटणी, जवस चटणी व इतर नावीन्यपूर्ण चटण्यांचे प्रकार शिकवले जाणार आहेत.
--------------------------------------------------------
इन्स्टंट लिक्विड ग्रेव्ही व्यावसायिक कार्यशाळा
रेडी टू कुक इन्स्टंट खाद्यपदार्थांना सध्याच्या धावपळीच्या युगात खूप महत्त्व आले आहे. दैनंदिन गरजेमुळे बाजारपेठेमध्ये या पदार्थांना मागणी असल्याने या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यास संधी आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक स्वरूपातील एक दिवसीय कार्यशाळा १६ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. यामध्ये पंजाबी रेड, हैदराबादी, व्हाईट, फिश करी, महाराष्ट्रीयन, सावजी, साऊथ इंडियन या ग्रेव्ही तसेच इडली-डोसा पीठ, आले-लसूण पेस्ट व कोल्हापुरी तांबडा व पांढरा रस्सा प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच याचा व्यवसाय कसा उभारावा, उपलब्ध बाजारपेठ, पॅकेजिंग, लेबलिंग, कॉस्टिंग, मार्केटिंग, फायनान्स आदींची माहिती दिली जाणार आहे.
--------------------------------------------------------
ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४
क्यूआर कोड :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.