सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे निरवडे येथील वृद्धाश्रमाला मदत
swt3125.jpg
88521
निरवडेः येथील लिटिल सिस्टर्स ऑफ द पुअर वृद्धाश्रमाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे
निरवडे येथील वृद्धाश्रमाला मदत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ : ‘अनाथांचा आधार बनणे हीच खरी ईश्वरसेवा’ या शिकवणुकीनुसार कार्यरत असलेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे निरवडे (ता. सावंतवाडी) येथील लिटिल सिस्टर्स ऑफ द पुअर या वृद्धाश्रमातील गरजू वृद्धांसाठी १२ हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात डायपर, डेटॉलसह रूम क्लिनिंगसाठी लागणाऱ्या वस्तूंचा समावेश होता.
या वृद्धाश्रमात ७५ ते ८० वयोगटातील सुमारे ७५ ते ८० वृद्ध महिला व पुरुष वास्तव्यास आहेत. त्यापैकी अनेकजण अंथरुणाला खिळलेले असून, चालण्यास असमर्थ आहेत. त्यांची काळजी घेणे, औषधपाणी देणे आणि डायपर बदलणे ही जबाबदारी सिस्टर पार पाडतात. डायपरचा मोठा खर्च लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने या गरजेसाठी मदतीचा हात पुढे केला. सिस्टर अनिता रोस यांनी प्रतिष्ठानच्या रूपा गौंडर व रवी जाधव यांच्याकडे अत्यावश्यक वस्तूंची मागणी केली होती.
त्यानुसार रूपा गौंडर, शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम आणि रवी जाधव यांनी विशेष पुढाकार घेत ही मदत पोहोचवली. याआधीही प्रतिष्ठानने जीवनावश्यक वस्तू देऊन आश्रमाला मदत केली होती. तसेच येथील एका वृद्ध महिलेचे डोळ्यांचे ऑपरेशन डॉ. तळेगावकर यांच्या मदतीने मोफत करून दिले होते. या सेवाभावी उपक्रमाबद्दल सिस्टर रोस यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.