सोमेश्वर येथे देखावा
rat१p७.jpg-
२५N८८६२०
रत्नागिरी : सोमेश्वर येथे मयुर भितळे व सहकाऱ्यांनी साकारलेला जिजाऊ रुग्णालयाचा देखावा.
----
गणेशोत्सवात ‘आरोग्यसेवेची’ अनोखी मानवंदना
मयुर भितळे यांनी साकारला सोमेश्वर येथे जिजाऊच्या रुग्णालयाचा देखावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : कोकणात गणेशोत्सवाची धूम आहे. मुंबई-पुण्यातील देखाव्यांप्रमाणे रत्नागिरीतही ग्रामीण भागात अनेक कलाकार विविध प्रकारचे देखावे साकारून त्यातून संदेश देण्याचा प्रयोग करत आहेत. तालुक्यातील सोमेश्वर येथील युवक मयुर सुरेश भितळे यानेही नीलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या मोफत रुग्णालयाच्या कार्याला देखावा साकारून अनोखी मानवंदना दिली आहे. हा देखावा लक्षवेधी ठरला असून अनेक लोक हा देखावा पाहण्याकरिता आवर्जून भितळे यांच्या घरी भेट देत आहेत.
सोमेश्वर ग्रामपंचायतीजवळ मयुर भितळे याचे घर असून तेथे देखावा साकारला आहे. शहरातील नाचणे- आयटीआय येथे भगवान महादेव सांबरे यांनी गोरगरिबांसाठीचे मोफत रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयाची प्रतिकृती मयूर भितळे यांनी साकारली आहे. केवळ एक इमारत नव्हे, तर श्री. सांबरे यांनी समाजात पेरलेल्या माणुसकीच्या आणि सेवेच्या बीजांना मूर्त रूप दिले आहे. सांबरे यांनी ग्रामीण भागातील गरजू लोकांसाठी सुरू केलेली आरोग्यसेवा ही केवळ योजना नाही, तर ती हजारो कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे. ही प्रतिकृती म्हणजे केवळ कलात्मक आविष्कार नाही, तर ती प्रत्येक रत्नागिरीकराच्या मनात सांबरे यांच्याबद्दल आदराचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. आरोग्यसेवेसारख्या गंभीर विषयावर आधारित हा देखावा आहे. गणेशोत्सव हा फक्त एक सण नसून, तो समाजातील संवेदनशील विचारांना व्यासपीठ देणारा एक महत्त्वाचा उत्सव आहे. मयूरच्या कल्पकतेने आणि भावनेने रत्नागिरीकरांचे हृदय जिंकले आहे. त्यांनी केवळ गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही, तर सामाजिक बांधिलकीची एक गौरवगाथाच लोकांसमोर उभी केली आहे.
चौकट १
२०१७ पासून देखावे
मयुर भितळे २०१७ पासून वेगवेगळ्या विषयावर देखावे साजरे करत आहे. २०२१ ला साकारलेल्या गोवर्धन पर्वताला द्वितीय क्रमांक क्रमांक मिळाला होता. तसेच सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारावर २०२३ ला चलचित्र देखावा साकारला होता. २०२४ मध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या आणि वाढते शहरीकरण या यावर चलचित्र देखावा साकारला होता.
कोट
मी दरवर्षी गणेशोत्सवात देखावे साकारतो. नीलेश सांबरे यांच्या सामाजिक कार्यासाठी यंदा रुग्णालयाचा देखावा साकारला आहे. याकरिता दोन महिने मेहनत घेतली असून देखावा साकारण्यासाठी मला शुभम आग्रे, सौरव बळकटे, तेजस खापरे, संजय खापरे व मारुती लोहार व कुटुंबियांची मदत मिळाली आहे.
- मयुर भितळे, सोमेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.