शेतशिवारात भरघोस धान्य पिकू दे

शेतशिवारात भरघोस धान्य पिकू दे

Published on

swt17.jpg
88632
ओटवणेः सामूहिक भात कापणी करून ‘नवे’ साजरे करण्यात आले.

शेतशिवारात भरघोस धान्य पिकू दे
शेतकऱ्यांचे गाऱ्हाणेः ओटवणेत पारंपरिक ‘नवे’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १ः गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या येथील आगळ्यावेगळ्या ''नव्या''चा अर्थात सामूहिक भात कापणीचा प्रारंभ रविवारी (ता. ३१) सकाळी पारंपरिक पद्धतीने करण्यात आला. आंब्याची पाने, गंध, हळद, पिंजर नव्याला लावून हे नवे तोरणाच्या स्वरुपात आकर्षक सजवून घराच्या उंबरठ्यावर लावण्यात आले. यानिमित्त गावातील प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर या नव्याच्या तोरणाचा साज सजलेला होता.
या नव्याद्वारे ओटवणे गावात निसर्गासह ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालण्याची प्रथा आहे. दरवर्षी पूर्व नक्षत्रात गणेश चतुर्थीत नवे साजरे करण्याची प्रथा आहे. श्रावणानंतर शेत पीक बहरात येऊन सर्वत्र हिरवीगार शेती दृष्टीस पडते. शेतकऱ्याच्या दृष्टीने हा सुगीचा काळ असून शेतात काबाडकष्ट करून पिकविलेले धान्य पदरी पाडण्यासाठी नवे केले जाते.
सकाळीच कुळघराकडे दवंडी देण्यात आली. त्यानंतर कुळ घराकडे ग्रामस्थ जमा झाल्यानंतर सर्वजण सवाद्य नवे साजरे करण्याच्या ठिकाणी आंबेडकरनगर नजीक गेले. पुरोहिताच्या मंत्रोच्चारात भात पिकाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर ढोलांच्या गजरात हातातोंडाशी आलेल्या भातपिकाच्या संवर्धनासाठी आणि भरघोस पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडू दे, असे गाऱ्हाणे घालण्यात आले.
यावेळी भात कापणी करून कापलेले नवे कापडात लपेटून ग्रामस्थ पुन्हा सवाद्य कुळ घराकडे मार्गस्थ झाले. नंतर हे नवे घरी नेऊन ग्रामस्थांनी त्याची उंबरठ्यावर पूजा केली व नवे घरात आणण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com