नाणीज हायस्कूलचा उपक्रम
-rat१p१०.jpg-
२५N८८६३५
रत्नागिरी : नाणीज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवात स्वदेशी जागरणाची पत्रके वाटून प्रबोधन केले.
---
स्वदेशी जागरण, पर्यावरण रक्षण उपक्रम
नाणीज हायस्कूलचा उपक्रम; १२०० घरांमध्ये पोहोचले विद्यार्थी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : तालुक्यातील नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गणेशोत्सवासाठी ‘स्वदेशी जागरण-पर्यावरण रक्षणर’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. समाजशास्त्र विषय समितीमार्फत याचे नियोजन करण्यात आले होते.
राष्ट्रहिताचा विचार करण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर करून शासनाची मेक इन इंडिया ही योजना पुरस्कृत करताना सामान्य भारतीय नागरिक म्हणून देशाचा अर्थव्यवस्थेला बळकटी आणणे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकमुक्त गणपती उत्सव साजरा करणे, धार्मिक बाबींमधील संस्कृती व परंपरा विरोधी गोष्टींना प्रतिबंध करणे आदी विविध उद्देश योजून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी नववीच्या विद्यार्थ्यांनी एक पत्रक तयार करून कोणत्या गोष्टीमध्ये बदल अपेक्षित असून त्याऐवजी काय करता येऊ शकते, हे आजूबाजूच्या दशक्रोशीतील ग्रामपंचायत व ग्रामस्थांना प्रत्यक्ष संपर्क करून समजावून सांगितले. नाणीज, खानू, कशेळी (रत्नागिरी तालुका), चोरवणे, घाटीवळे-करंजारी (संगमेश्वर तालुका), आंजणारी, नांदिवली, शिरंबवली ग्रुप ग्रामपंचायत (लांजा तालुका) अशा तीन तालुक्यातील नऊ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. सुमारे १२०० घरांपर्यंत विद्यार्थ्यांनी याचा प्रसार व प्रचार स्वयंस्फूर्तीने केला. हा उपक्रम प्रशालेच्या मुख्याध्यापिका रूपाली सावंतदेसाई व समाजशास्त्र विषय समितीचे अध्यक्ष उत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाने पार पडला. या उपक्रमाला मुंबईच्या दिलीप माने यांनी साहाय्य केले.
चौकट १
हे टाळा
थर्माकोलच्या मखराची आरास. विदेशी कंपनीची तोरणे, स्पॉट लाईट्स. प्रसादासाठी च्युईंगमचे मोदक किंवा प्लास्टिकच्या आवरणातील पदार्थ. मिरवणुकीवेळी हिंदी सिनेमातील किंवा रिमिक्स गाणी डॉल्बीवर वाजवणे. रासायनिक रंगांची उधळण. फटाक्यांवर धार्मिक देवी-देवतांची किंवा राष्ट्रीय प्रतीकांची चित्रे. देवतांची व राष्ट्रीय प्रतीकांची चित्रे असणारी फटाक्यांसारखी कोणतीही ज्वलनशील वस्तू घेऊ नका.
चौकट २
हे करा
बांबू, पुठ्ठे, रंगीत कागद, घोटीव पेपराद्वारे मखरांची सजावट करा. स्वदेशी कंपनीची तोरणे, लायटिंग खरेदी करा किंवा स्वतः तयार करा. प्रसादासाठी खोबऱ्याच्या वड्या, शेंगदाणा लाडू, उकडीचे मोदक ठेवावेत. ढोल पथक, लेझीम, मृदुंग टाळ यांच्या साथीने धार्मिक गीते व नृत्यांचे आयोजन करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.