कृत्रिम तलावातील विसर्जनासाठी जागृती

कृत्रिम तलावातील विसर्जनासाठी जागृती

Published on

-ratchl११.jpg-
२५N८८७३१
चिपळूण ः पालिका प्रशासनाने तयार केलेले कृत्रिम तलाव.
-ratchl१३.jpg-
२५N८८७३२
नदीकिनारी असलेली सुरक्षा व्यवस्था.
-----
नदी वाचवा-कृत्रिम तलावात विसर्जन करा
चिपळूण पालिकेकडून जनजागृती ; प्रशस्तिपत्र देणार, ११ ठिकाणी व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः गणेशविसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पालिकेने जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील ११ ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. तेथे आपत्ती व्यवस्थापनामधील सुमारे १०५ कर्मचारी, ५ यांत्रिकी बोटी, नियमित बोटी तैनात केले आहेत. नदीत गणेश विसर्जन न करता ते कृत्रिम तलावात करण्यासाठी पालिकेने जागृती मोहीम राबवली. कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या नागरिकांना पालिकेकडून प्रशस्तिपत्र दिले जात आहे.
गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी (ता. २) मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन केले जाते. विसर्जनासाठी गणपती विसर्जन घाट, तलाव परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते. यासाठी पालिकेने गेल्या काही दिवसापासून याबाबतच्या उपाययोजना आणि व्यवस्था उपलब्ध केल्या आहेत. शहरातील बहादूरशेखनाका वाशिष्ठी विसर्जन घाट, गांधारेश्वर मंदिर, बाजारपेठ, पाग लेगनवाडी मारुती मंदिर, पाग मिरगल घराजवळील विसर्जन घाट, रामतीर्थ तलाव, गोवळकोट, उक्ताड, खेंड खेडेकर घर, विरेश्वर तलाव आदी ठिकाणी विसर्जनासाठीची व्यवस्था पालिकेने केली आहे. जेथे पाण्याला वेग जास्त आहे, अशा ५ ठिकाणी यांत्रिकी बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील तलावांच्या ठिकाणी नियमित साध्या बोटींची व्यवस्था आहे.
नदीत विसर्जन केल्याने पाणी दूषित होते. यासाठी पालिकेने ८ ठिकाणी कृत्रिम तलाव केले आहेत. तिथेच निर्माल्य संकलन करण्यासाठी निर्माल्य कुंडांची व्यवस्था केली आहे. सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शहरातील काही पाखाड्या, रस्त्यावर शेवाळ आल्याने ते गुळगुळीत झाले आहेत. तेथे गणेशभक्तांना बाधा पोहोचू नये, यासाठी ब्लिचिंग पावडर टाकून पाखाड्या, रस्ते सुरक्षित केले आहेत. गेल्या आठवड्यापासून खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसात भरलेले खड्डे पुन्हा उखडले जात आहेत. जे नागरिक कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करतील त्यांना पालिकेकडून प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. ज्यांनी दीड दिवसाचे गणपती कृत्रिम तलावात विसर्जित केले, त्यांनाही यापूर्वीच प्रशस्तिपत्र देण्यात आले आहे. नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.
---
चौकट
भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
भाविकांच्या सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट्स, बोये, रबरी ट्यूब, रस्सी, बॅटरी, रोषणाई आणि इतर साधनांचीही पूर्तता करण्यात आली आहे. शेवाळ धरलेले रस्ते व पाखाड्यांवर ब्लिचिंग पावडर टाकून सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. पावसामुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन खड्डे बुजवण्याचे कामही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com